सातशे वर्षांपूर्वीच्या पुरातन महादेव मंदिराचा जीर्णाेद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:30 AM2021-03-06T04:30:23+5:302021-03-06T04:30:23+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले व सातशे वर्षांपूर्वीचे पुरातन शंभू महादेव मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येत ...

Restoration of the ancient Mahadev temple seven hundred years ago | सातशे वर्षांपूर्वीच्या पुरातन महादेव मंदिराचा जीर्णाेद्धार

सातशे वर्षांपूर्वीच्या पुरातन महादेव मंदिराचा जीर्णाेद्धार

googlenewsNext

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले व सातशे वर्षांपूर्वीचे पुरातन शंभू महादेव मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी लाेकवाटा जमा करून हे काम हाती घेतले आहे.

पिंपळा खुर्द गावात सातशे वर्षांपूर्वीचे पुरातन महादेवाचे जागृत देवस्थान आहे. या मंदिराचा लाेकसहभागातून जीर्णाेद्धार करण्याचा निर्णय झाल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात केली. पुणे येथील दत्त आश्रम मठाचे तुकाराम बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम वर्षभरापासून सुरू आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी भरीव लोकवाटा जमा केला. बांधकामासाठी लागणारा दगड नेवासा, देगलूर येथून मागविण्यात आला आहे. दगड घडविण्यासाठी, तसेच कलाकुसरीसाठी परभणी जिल्ह्यातील १० कारागीर बाेलाविण्यात आले आहेत. हे काम दाेन वर्षांत पूर्ण हाेईल, असे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. यासाठी २ काेटी २५ लाख रुपये लाेकवाटा उभारण्याचा संकल्पही केला आहे. या माध्यमातून मंदिराला चकाकी येण्यास मदत हाेणार आहे.

चौकट

गावकऱ्यांच्या एकीचे दर्शन...

गावातील काेणतेही सार्वजनिक काम असाे की निवडणुका. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन निर्णय घेतात. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी एकत्र बसून ग्रामपंचायत बिनविराेध काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ९ जागा बिनविराेध निघाल्या. सध्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही ग्रामस्थ अशाच पद्धतीने एकत्र आले आहेत.

देवस्थानास ‘क’ दर्जा...

पिंपळा गावातील पुरातन महादेव मंदिरास १० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात साेईसुविधांमध्ये भर पडणार आहे. सोमवारी येथे दर्शनासाठी भाविक माेठी गर्दी करतात. श्रावण महिन्यात ग्रंथपठण, तर चैत्र महिन्यामध्ये वार्षिक यात्रा यात्राैत्सव साजरा केला जाताे.

Web Title: Restoration of the ancient Mahadev temple seven hundred years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.