जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशीला देशमुख, तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार अमित भारती, पुरवठा निरीक्षक संदीप जाधव, सहायक गटविकास अधिकारी एम. एच. राऊत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या साेडतीतून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या. यापैकी ९ ग्रामपंचायती महिला उमेदवारासाठी आहेत. यात दहीटणा, बाभळगाव-केरूर, वडगाव देव, वडगाव लाख, हिप्परगा ताड, तीर्थ बु., चिकुंद्रा, कात्री, काळेगाव या महिला उमेदवारासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मोर्डा-तडवळा, भातंब्री, कसई, गुजनूर, देवसिंगा तुळ, आपसिंगा, हंगरगा तुळ, इटकळ, ढेकरी या ग्रामपंचायती सुटल्या आहेत.
अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिला सरपंच पदासाठी नंदगाव एकमेव ग्रामपंचायत आरक्षित आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २९ ग्रामपंचायती आरक्षित आहेत. यातील १५ ग्रामपंचायती महिलांकरिता आरक्षित झाल्या. यात दीपकनगर, माळूब्रा, फुलवाडी, पिंपळा खुर्द, बोरनदवाडी नळ, धोत्री, बारूळ, मुर्टा-मानमोडी, गंधोरा, कुंभारी, कदमवाडी, गंजेवाडी, आरबळी, पांगरधरवाडी, पिंपळा बु. यांचा समावेश आहे. तर नामाप्रसाठी काटगाव-घट्टेवाडी, केमवाडी, होर्टी, केशेगाव, निलेगाव, बोळेगाव, मसला खुर्द, मानेवाडी, हगलूर, शहापूर, बसवंतवाडी, तीर्थ खुर्द, हंगरगा नळ-इंदिरानगर, सलगरा या ग्रामपंचायती सुटल्या आहेत. उर्वरित ६० पैकी ३० ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित आहेत. यात दहीवडी व सराटीसह वडगाव काटी, धनेगाव, सावरगाव, सलगरा ततार, जलकोटवाडी (सा)- गवळेवाडी, येवती, खानापूर, खडकी-शिवाजी नगर, काटी, तामलवाडी, चिवरी, किलज, सारोळा, खुदावाडी, मंगरूळ, आरळी खुर्द, दिंडेगाव-टेलरनगर, रायखेल, बोरगाव, खंडाळा, होनाळा, रामतीर्थ, वागदरी, शिरगापूर, कामठा, चिंचोली, वानेवाडी, येडोळा, दहीवडी, सराटी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
चाैकट...
सर्वसाधारण प्रवर्ग - गुळहळ्ळी, सांगवी काटी, सांगवी मार्डी,गोंधळवाडी,शिराढोण, जवळगा मे,उमरगा चिवरी,वाणेगाव,अणदूर,सिंदगाव,देवकुरुळी,जळकोट,काक्रंबा, बीजनवाडी,धनगरवाडी, सुरतगाव,आलियाबाद, सिंदफळ,अमृतवाडी,बोरी,कार्ला,चव्हाणवाडी,वडाचा तांडा,देवसिंगा नळ, सरडेवाडी, नांदुरी,लोहगाव,आरळी बु,कुन्सावळी या तीस ग्रामपंचायती सर्वसाधारण गटातील उमेदवारासाठी सुटल्या आहेत.