शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

Dharashiv Flood: भूम-परांड्यात पुरात अडकलेल्या २३९ जणांचे रेस्क्यू; NDRF चे धाराशिव जिल्ह्यात मोठे बचावकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:59 IST

Dharashiv Flood Rescue: दोन दिवस मोठे रेस्क्यू ऑपरेशन! उसाच्या फडातून वाट काढत एनडीआरएफ जवानांनी गावकऱ्यांची केली सुटका.

- संतोष वीरभूम (धाराशिव): जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि नदीच्या पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटानंतर प्रशासनाने तातडीने पुणे येथील एनडीआरएफच्या दोन तुकड्यांना (५ बटालियन) पाचारण केले होते. या तुकड्यांनी भूम आणि परांडा तालुक्यात मोठे बचावकार्य (रेस्क्यू ऑपरेशन) राबवले.

भूम तालुक्यातील जयवंत नगर येथील वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा दिला असला तरी, पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने मोठी रेस्क्यू ऑपरेशनची गरज पडली नाही. मात्र, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवळाली गावात गणेश तांबे (वय ३८) हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. या युवकाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने सलग दोन किलोमीटरपर्यंत सर्च ऑपरेशन केले. दुर्दैवाने, शोध सुरू असलेल्या भागात उसाचे मोठे फड असल्याने बोटींना सातत्याने अडथळा येत होता. यामुळे जवानांना सर्च ऑपरेशनमध्ये अडचणींचा सामना करावा लागला आणि युवकाचा अद्यापही पत्ता लागलेला नाही.

परांड्यात २३९ नागरिकांची यशस्वी सुटकायाउलट, परांडा तालुक्यात पूरपरिस्थिती अधिक गंभीर होती. नदीचे पाणी गावांमध्ये शिरल्याने येथे भयानक पूरस्थिती निर्माण झाली होती. एनडीआरएफच्या जवानांनी येथे तब्बल दोन दिवस रात्रंदिवस अथक परिश्रम घेत मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. यामध्ये वागेगव्हाण, कपिलापुरी, जगताप वस्ती आणि ठोंगे वस्ती या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वागेगव्हाण (१८०), कपिलापुरी (१२), जगताप वस्ती (२७) आणि ठोंगे वस्ती (२०) अशा एकूण २३९ नागरिकांना जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले.

जवानांच्या धाडसाला सलामएनडीआरएफ टीमचे प्रमुख इन्स्पेक्टर महेंद्रसिंग पुनिया यांनी माहिती दिली की, ठोंगे वस्ती भागात उसाचे आणि मकाचे फड असल्याने पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत बोट पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे जवानांनी बोट बाजूला लावून पाण्यातून वाट काढत नागरिकांपर्यंत पोहोचले आणि ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी आणले. एनडीआरएफ जवानांचे हे धाडसी काम पाहून स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि जवानांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रशासनाकडूनही या बचावकार्याची दखल घेण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NDRF Rescues 239 Stranded in Flood-Hit Bhum-Paranda, Osmanabad District

Web Summary : NDRF teams rescued 239 people stranded by floods in Bhum and Paranda, Osmanabad. A search for a missing man continues amidst sugarcane fields.
टॅग्स :dharashivधाराशिवfloodपूरRainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र