शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात

By मोरेश्वर येरम | Updated: January 17, 2021 17:20 IST

उद्या (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. 

ठळक मुद्देआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणाराज्याच्या आरोग्य विभागात एकूण १७ हजार पदांची भरतीपहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्याच प्रसिद्ध होणार जाहीरात

राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरती संदर्भातील मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून लवकरच  एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरतीची जाहिरात उद्याच प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

"कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला होता. आरोग्य यंत्रणेवरील सध्याचा ताण लक्षात घेता येत्या काळात एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे", असं राजेश टोपे म्हणाले. उद्या (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. 

कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्यांचं काय?कोरोना काळात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं नोकरीचं कंत्राट संपलं असलं तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरतीवेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. 

दोन टप्प्यात नोकर भरतीआरोग्य विभागात एकूण १७ हजार पदांची भरती करण्यात येणार असून यात पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील भरती ही ग्रामविकास विभागाशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आहे. या भरतीत क आणि ड वर्गातील पदं भरली जाणार आहेत. यात नर्सेस, वॉर्ड बॉय, क्लर्क आणि टेक्निशियनचा समावेश असणार आहे.  

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यjobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस