शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यंदा पाऊसमान चांगले राहील; पंचांगकर्त्यांसह हवामान तज्ज्ञांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:57 IST

शेतकरी हवालदिल न होता सुखात व आनंदात राहतील, असा अंदाज पंचांगकर्त्याने वर्तविला आहे.

- व्ही. एस. कुलकर्णीउदगीर : यंदाच्या शोभन नाम संवत्सरात मेघाचा निवास रजकाचे घरी असल्यामुळे पाऊस पुष्कळ प्रमाणात होऊन धन-धान्यांची समृद्धी होईल. एकंदरित हे वर्ष चांगले असणार आहे. मात्र, सोसाट्याचा वारा सुटून संकटे उद्भवतील. धान्यांची, धनाची नासाडी होऊन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज पंचांगकर्ते व हवामान तज्ज्ञाने वर्तविला आहे.

यंदा गूळ, तूप, मध कमी प्रमाणात मिळणार आहे. तसेच मणी, मोती, सोने महाग होणार आहे. जनावरांकडून दूध, दुभते भरपूर मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रम वाढत जातील. शेतकरी हवालदिल न होता सुखात व आनंदात राहतील, असा अंदाज दाते व अन्य एका पंचांगकर्त्याने वर्तविला आहे. तर अन्य तिसऱ्या एका पंचांगकर्त्याने पावसाचे मान निराशाजनक असून, काही ठिकाणी ओला तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळाला तोंड द्यावे लागेल. शेती व पिकाविषयीचे अंदाज चुकतील. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवेल व रोगराईचे प्रमाण वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे.

एप्रिलच्या मध्यापासून उष्णतामानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मेच्या मध्यभागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या पावसाला १५ जूनपासून सुरुवात होईल. ८ जून रोजी मृग नक्षत्रास सुरुवात होणार असली तरी २२ जूननंतर पावसाला सुरुवात होऊन खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ होईल. ऑक्टोबरपर्यंत भरपूर पाऊस होणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविला आहे.

२०२३ मध्ये चांगला पाऊस होणार : पंजाब डकप्रत्येक भूभागाला एकच समुद्र आहे. मात्र महाराष्ट्राच्या बाजूला अरबी व बंगालच्या खाडीचे असे दोन समुद्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दरवर्षी ७ जूननंतर पाऊस होतोच. इलनिनो व लालीना या समुद्रातील प्रक्रिया आहेत. सध्या समुद्रात इलनिनोची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दुष्काळ पडतो, अशी अफवा सुरू आहे. शेतकऱ्यांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये. २०२३ मध्ये चांगला पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी केले आहे.

कलियुगाचे सहा शककर्ते, ४ लक्ष २६ हजार ८७६ वर्षे शिल्लक !...कलियुगात सहा शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर (धर्मराज) झाला. त्याचा शक ३ हजार ४४ वर्षे, दुसरा उज्जयिनीत विक्रम झाला. त्याचा शक १३५ वर्षे, तिसरा पैठण येथे शालिवाहन. त्याचा शक १८ हजार वर्षे. चौथा वैतरिणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल. त्याचा शक १० हजार वर्षे, पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक ४ लक्ष वर्षे, सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक ८२१ वर्षे. कलियुगातल्या एकूण वर्षातून ५१२४ वर्षे मागे पडली व ४ लक्ष २६ हजार ८७६ वर्षे शिल्लक आहेत.

 

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीagricultureशेती