वंचित शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST2021-01-13T05:26:10+5:302021-01-13T05:26:10+5:30

लोहारा : लोहारा तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी विमा कंपनीस सूचना द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी ...

Provide immediate crop insurance benefits to disadvantaged farmers | वंचित शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ द्या

वंचित शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ द्या

लोहारा : लोहारा तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी विमा कंपनीस सूचना द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी खा. शरद पवार व खा. सुप्रियाताई सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तालुक्यातील एकूण ५९ हजार २४८ शेतकऱ्यांनी यावर्षीचा प्रधानमंत्री खरीप पीक विमा उतरविला होता. यामध्ये प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, सोयाबीन आदी पिकांचा समावेश होता. ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील बहुतांश भागात सलग दोन दिवस अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून सरसकट मदत दिली. परंतु, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला असतानाही विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे बहुतांश शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळू शकली नाही. तालुक्यातील फक्त ५ हजार ५२४ शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १० हजार प्रमाणे विमाकंपनीने तुटपुंजी मदत दिली आहे.

वास्तविक कृषी विभागाने नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला आहे. त्याची माहिती विमा कंपनीला दिला असतानाही विमा कंपनीकडून जाणीवपूर्वक अटी व नियमांवर बोट ठेवून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आपण विमा कंपनीला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी साळुंके यांनी केली आहे.

Web Title: Provide immediate crop insurance benefits to disadvantaged farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.