शिबिराच्या माध्यमातून सुटताहेत शिधापत्रिकेबाबतच्या अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST2021-08-24T04:36:41+5:302021-08-24T04:36:41+5:30
या शिबिरात नायब तहसीलदार संदीप जाधव, शिवसेना जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण नगर सेवक शहबाज काझी, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, ...

शिबिराच्या माध्यमातून सुटताहेत शिधापत्रिकेबाबतच्या अडचणी
या शिबिरात नायब तहसीलदार संदीप जाधव, शिवसेना जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण नगर सेवक शहबाज काझी, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, मंडल अधिकारी अमर गांधले, शिवसेना तालुकाप्रमुख उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहराध्यक्ष संतोष पुदाले, मंडल अधिकारी शिंदे आदींची उपस्थिती होती. तहसीलदार तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधापत्रिका धारकांच्या समस्या जागेवर सोडवून नवीन शिधापत्रिका, नाव कमी-जास्त करणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, नाव कमी करणे, महात्मा फुले जीवनदायी प्रमाणपत्र देणे, मदत कक्ष असे स्वतंत्र टेबल मांडण्यात आले होते. याकामी मंडळ निरीक्षक अमर गांधले व शिंदे यांचेही सहकार्य लाभले.
नायब तहसीलदार संदीप जाधव यांनी रेशनकार्ड संदर्भात माहिती देऊन प्रत्येक ग्रामस्थांना रेशनकार्ड संदर्भातील आपली समस्या मांडण्याची संधी दिली. तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार संदीप जाधव, मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी तुकाराम कदम, अव्वल कारकून एस. जी. पवार, महसूल सहायक पी. जी. कानडे, औदुंबर गिरी, सुरेश वाघमारे, बाळू सोनवणे, अंकुश जाधव आदींनी पुढाकार घेतला.