शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संस्थाचालकांच्या छळाचा पाढा; मृत्यूपूर्वी मुख्याध्यापकांनी लिहीलं काळजाचा थरकाप उडवणारं सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:42 IST

मुख्याध्यापक जाधवांच्या आत्महत्येने उमरगा सुन्न; कुटुंबाचा आधार कोसळला.

धाराशिव : हिप्परगा राव येथील एका खासगी शाळेवरील प्रभारी मुख्याध्यापकांनी संस्थाचालक व सहकारी शिक्षकांवर छळाचा आरोप करणारी चिठ्ठी लिहून सोमवारी उमरगा येथे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत उमरगा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

उमरगा तालुक्यातील हिप्परगा राव येथील एका खासगी शाळेवर टी. व्ही. जाधव हे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. त्यांनी रविवारी रात्री उमरगा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर उमरगा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचानामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. तपासणीनंतर सोमवारी सायंकाळी मयत जाधव यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी उमरगा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. मृत्यूनंतर जाधव यांची एक सुसाइड नोट समोर आली असून, त्यात संस्थाचालक व सहकारी शिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, याविषयी कोणतीही तक्रार अद्याप प्राप्त झाली नसल्याचे उमरगा ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी सांगितले.

चिठ्ठीत १० लाख मागितल्याचा आरोपटी.व्ही. जाधव यांच्या पूर्वीचे मुख्याध्यापक निवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार जाधव यांना मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती देण्यासाठी संस्थेच्या संचालकांनी १० लाख रुपये मागितल्याचा दावा सुसाइड नोटमध्ये केला आहे. मात्र, ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर सहकारी शिक्षकांच्या माध्यमातून छळ सुरू करण्यात आल्याचा दावाही टी. व्ही. जाधव यांनी चिठ्ठीतून केला आहे. मात्र, या चिठ्ठीतील हस्ताक्षर जाधव यांचेच आहे किंवा नाही, याबाबत कोणतीही सत्यता स्पष्ट होऊ शकली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Principal's suicide note reveals harassment by school management; shocking truth!

Web Summary : A principal in Dharashiv, Maharashtra, tragically ended his life, alleging harassment by school management and colleagues in a suicide note. He claimed they demanded ₹10 lakh for his appointment and subsequently harassed him when he refused. Police are investigating the matter.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव