‘आयुर्वेद’चे पदव्युत्तर विद्यार्थी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 15:51 IST2020-10-09T15:50:56+5:302020-10-09T15:51:46+5:30

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला असून विविध मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.

Post-graduate students of 'Ayurveda' on strike | ‘आयुर्वेद’चे पदव्युत्तर विद्यार्थी संपावर

‘आयुर्वेद’चे पदव्युत्तर विद्यार्थी संपावर

उस्मानाबाद : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला असून विविध मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.

उस्मानाबादच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे कोविड उपचारावर परिणाम होण्याची भिती आहे़. शुक्रवारी सकाळी या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात एकत्र येऊन घोषणाबाजी करीत आंदोलनास सुरुवात केली़.

मागील ६ महिन्यांपासून आम्ही विद्यार्थी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून कोविड रुग्णांवर उपचार करीत आहोत़. तरीही आमच्यावर शासनाकडून अन्याय होत आहे़. १२ ऑगस्ट रोजी शासनाने पदव्युत्तर वैैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दरमहा १० हजार रुपयांनी वाढ केली़. मात्र, यातून आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले़. ही निषेधार्ह बाब असून अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा शिक्षण कालावधी ३१ ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे़. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने त्यांची ३१ डिसेंबरपर्यंत कोविड ड्युटी लावली आहे़ आता प्रथम व अंतिम वर्षाच्या परिक्षाही तोंडावर आल्या आहेत़. याअनुषंगाने शैैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोविड ड्युटीतून सूट मिळावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

 

Web Title: Post-graduate students of 'Ayurveda' on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.