घटस्थापनेसाठी तुळजापुरात भाविकांचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:11 IST2018-10-10T12:09:49+5:302018-10-10T12:11:07+5:30

श्री तुळजाभवानी मातेच्या घटस्थापणेची तयारी पूर्ण झाली आहे.

Pilgrims visit for Ghatshapana at Tulajapur | घटस्थापनेसाठी तुळजापुरात भाविकांचा ओघ

घटस्थापनेसाठी तुळजापुरात भाविकांचा ओघ

तुळजापूर ( उस्मानाबाद) : श्री तुळजाभवानी मातेच्या घटस्थापणेची तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात विधींना सुरुवात होईल. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते कल्लोळ तीर्थापासून घट मंदिराकडे रवाना होतील.

तीन घटांपैकी एक गणेश मंदिरात स्थापन होईल. त्यानंतर देवीच्या गाभाऱ्यात दुसऱ्या घटाची तर मतंगीदेवीचे गाभाऱ्यात तिसरा घट स्थापन होईल. या विधींना आता सुरुवात झाली आहे. यासाठी अनेक राज्यातून भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत.

 

Web Title: Pilgrims visit for Ghatshapana at Tulajapur