दिव्यांगांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST2021-07-31T04:33:28+5:302021-07-31T04:33:28+5:30
शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ‘सीएसआर’ योजने अंतर्गत व जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील ...

दिव्यांगांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- कांबळे
शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ‘सीएसआर’ योजने अंतर्गत व जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील २९४ दिव्यांग लाभार्थ्यांना गुरुवारी साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी त्या बाेलत हाेत्या. याप्रसंगी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, सभापती सचिन पाटील, जि.प. सदस्य धनराज हिरमुखे, सदस्या सुवर्णा भालेराव, संगिता मारेकर,बीडीओ कुलदीप कांबळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, प्रदीप पाटील खंडापूरकर, काशिनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष इसाक शेख, राणीताई स्वामी, अशोक गडदे, कमलेश यादव यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
अध्यक्षा कांबळे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही विविध याेजना राबविण्यात येत आहेत. प्रशासनाने शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जाऊन याेजनांचा लाभ द्यावा, असे आवाहन केले. यावेळी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनीही मनाेगत व्यक्त केले. कृषी अधिकारी महेश बिडवे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले तर समाजकल्याण अधिकारी चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी भारत कांबळे, नंदु पवार, सचिन कुलकर्णी, भगवान वाघमारे, बालाजी शिंदे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
चाैकट...
उमरगा तालुक्यातील २९४ दिव्यांग व्यक्तीला सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, या उदात्त हेतूने २६ लाख रुपयांचे साहित्य देण्यात आले आहे. त्याच्या राहणीमानात सुधारणा व्हावी आणि जीवन जगताना आनंद मिळावा म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याणच्या वतीने प्रयत्न करीत आहे. कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला या लाभापासून वंचित राहू दिले जाणार नाही.
-दिग्विजय शिंदे, सभापती, समजकल्याण.
हे साहित्य वाटप करण्यात आले.
तीनचाकी सायकल 90,बॅटरीची सायकल 04, व्हील चेअर 40, श्रवण यंत्र 44,अंध काटी 15, कृत्रिम आवयव 23, कुबडी 40, छडी 23, अंध बेल किट 05, डेली प्लेअर 05, स्मार्ट फोन 05