पाेलिसांना केली शिवीगाळ, धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST2021-02-05T08:20:19+5:302021-02-05T08:20:19+5:30
उस्मानाबाद - गस्त घालणा-या पाेलीस कर्मचा-यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याची घटना २२ जानेवारी राेजी परंडा शहरात घडली. याप्रकरणी सात ...

पाेलिसांना केली शिवीगाळ, धक्काबुक्की
उस्मानाबाद - गस्त घालणा-या पाेलीस कर्मचा-यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याची घटना २२ जानेवारी राेजी परंडा शहरात घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, परंडा ठाण्याचे पथक शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून कुर्डुवाडी रस्ता भागात गस्तीवर हाेते. याचवेळी येथील एका पानटपरीसमाेर सात ते आठ लाेकांत भांडण सुरू हाेते. त्यामुळे संबंधितांना हटकले असता शाहरूख सय्यद, आबुज तुटके, नियामत तुटके या तिघांनी पाेलिसांना शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर पाेलिसांनी माेमीन गल्लीतील त्यांच्या घरी जाऊन शाेध घेतला असता, त्यांच्या कुटुंबातील मज्जू तुटके, आयुब तुटके, बबलू तुटके, मैनू तुटके यांनी पाेलिसांना विराेध करून शिवीगाळ केली. तसेच कर्तव्यात अडथळा आणला, अशा स्वरूपाची फिर्याद याेगेश यादव यांनी परंडा पाेलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून उपराेक्त सात जणांविरुद्ध भादंविचे कलम १८६, ३५३, ३३२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.