शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत जेरबंद

By admin | Updated: July 17, 2014 01:09 IST

उस्मानाबाद : मावेजाची रक्कम देण्यासाठी मंजूर रकमेच्या पाच टक्के रक्कम लाच म्हणून स्वीकारताना येथील उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

उस्मानाबाद : मावेजाची रक्कम देण्यासाठी मंजूर रकमेच्या पाच टक्के रक्कम लाच म्हणून स्वीकारताना येथील उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथील एमआयडीसीसाठी काही शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीतील फळझाडांपोटी संबंधित शेतकऱ्यांना मावेजाही मंजूर झाला आहे. सदर मावेजाची रक्कम देण्यासाठी उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांनी संबंधित शेतकऱ्यांकडे मंजूर मावेजाच्या पाच टक्के इतकी रक्कम लाच म्हणून देण्याची मागणी केली असल्याची लेखी तक्रार दत्तात्रय अर्जुन देशमाने, अरूण केरबा गरड, दगडू भानुदास सोमासे, मुकुंद केरबा गरड, संजय जनार्दन उकरंडे, हणमंत बाबूराव नाईकवाडी आणि मोरे नामक महिला या सात शेतकऱ्यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले, पोनि शेख, पोनि बाचके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या शोभा राऊत यांच्याच उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी राऊत यांनी पंचांसमक्ष लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, राऊत यांच्या पर्समधून ३९ हजार २०० रूपये रक्कमही या पथकाने जप्त केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एसीबीच्या पथकाकडून राऊत यांच्या कार्यालयाची झाडाझडती व पंचनामा सुरू होता. (प्रतिनिधी)