शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

उस्मानाबाद, कळंबमध्येच खर्चला ४५ टक्के खासदार फंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 19:06 IST

निधी ठराविक तालुक्यांमध्येच अधिक प्रमाणात खर्च केल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर आले आहे. 

ठळक मुद्देलोहारा-उमरग्यात हात आखडताच परंडा, वाशीसह भूममध्ये अवघी ३५ कामे

उस्मानाबाद : लोकसभा मतदार संघामध्ये विकास कामे राबविण्याठी खासदारांना प्रत्येक वर्षी साधारपणे चार कोटी रूपये उपलब्ध करून दिले जातात. या निधीतून मतदार संघाचा चौफेर विकास होणे अपेक्षित आहे. मात्र, उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी मागील चार वर्षांत उपलब्ध झालेला निधी ठराविक तालुक्यांमध्येच अधिक प्रमाणात खर्च केल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर आले आहे. 

खासदार फंडातून मागील चार वर्षांत सुमारे ६७८ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी तीनशेवर कामे उस्मानाबाद, कळंब तालुक्यात झाली आहे. म्हणजेच म्हणजेच ४० ते ४५ टक्के फंड या दोन तालुक्यात खर्च झाला. तर दुसरीकडे परंडा, भूम आणि वाशी तालुक्यात केवळ ३५ कामे झाली आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांसोबतच बार्शी, औसा तसेच निलंगा तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. अशा मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी शासनाकडून प्रत्येक खासदारास दरवर्षी सुमारे ४ कोटी रूपये उपलब्ध करून दिलेल जातात. या निधीतून प्रवासी निवारे, विद्युत दिवे, रस्ते, नाल्या, सभामंडप आदी प्रकारची विकास कामे राबविता येतात. 

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनाही विकास कामे करण्यासाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी मिळाला. या निधीतून प्रत्येक तालुक्याला समान न्याय मिळणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. उस्मानाबाद-कळंब या विधानसभा मतदार संघात सद्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. नेमक्या याच भागात एकूण मंजूर कामांच्या ४० ते ४५ टक्के कामे देण्यात आली आहेत. ६७८ पैकी जवळपास ३०० कामे या दोन तालुक्यातील आहेत. २०१५-१६ मध्ये ४३, २०१६-१७ मध्ये ४६, २०१७-१८ मध्ये ६४ तर २०१८-१९ मध्ये ४८ कामे करण्यात आली. असे असतानाच दुसरीकडे डोंगरी भाग म्हणून ओळख असलेल्या भूमसह वाशी, परंडा तालुक्यात नाममात्र कामे राबविली. 

तीन तालुक्यात मिळून चार वर्षात केवळ ३५ कामे करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, भूम तालुक्यात यापैकी केवळ पाच कामे आहेत. सेनेचा गड म्हणून ओळख असलेल्या पंडा तालुक्यातही फारसे समाधानकारक चित्र नाही. १५-१६ मध्ये या तालुक्यात एकही काम झाले नाही. २०१६-१७ मध्ये केवळ एका काम करण्यात आले. २०१७-१८ मध्ये ११ कामे तर २०१८-१९ मध्ये ७ अशी चार वर्षात अवघी १९ कामे झाली.  वाशी तालुक्यात राबविलेल्या कामांची संख्याही बोटावर मोजण्याइतपत आहे. चार वर्षात केवळ ११ कामे करण्यात आली आहेत. या प्रकाराबाबत तीनही तालुक्यांतील नागरिकांतून आता नाराजी व्यक्त केली जात आहे.

उमरगा-लोहाऱ्यात केवळ ८२ कामेउमरगा-लोहाऱ्याला सेनेचा गड म्हणून ओळखले जाते. हा विधानसभा मतदार संघ सेनेच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे, खा. गायकवाड हे याच तालुक्यातील रहिवासी आहेत. असे असतानाही या तालुक्यांना फारसा निधी मिळाला नाही. चार वर्षात ८२ कामे मंजूर करण्यात आली. चार वर्षांचा विचार करता, साधारपणे वर्षाकाठी २० म्हणजेच एका तालुक्याच्या वाट्याला अवघी दहा कामे येतात. असे असतानाच दुसरीकडे एकट्या औसा तालुक्याला ८० कामे देण्यात आली आहेत. औसा विधानसभा मतदार संघावर काँग्रेसची सत्ता आहे, हे विशेष.

भूम-परंड्यापेक्षा बार्शीला झुकते मापभूम-परंडा या दोन तालुक्यांत चार वर्षामध्ये केवळ २४ ते २५ कामे राबविण्यात आली आहेत. असे असतानाच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यासाठी मात्र, वर्षभरात ६४ कामे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या मतदार संघावर आ. दिलीप सोपल यांच्या रूपाने राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. 

तुळजापुरात ५८ वर कामेतुळजापूर विधानसभा मतदार संघावर आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. सेनेचा बालेकिल्ला असलेल्या उमरग्यापेक्षा तुळजापूरला जास्त विकास कामे राबविण्यात आली आहेत. चार वर्षामध्ये ५५ ते ५८ कामे करण्यात आली आहेत. 

दृष्टिक्षेपात विकास कामेतालुका        संख्याउस्मानाबाद    २०१कळंब        ९८भूम        ०५परंडा        १९वाशी        ११लोहारा        २७उमरगा        ५५तुळजापूर    ५८औसा        ८०बार्शी        ६४निलंगा        ६०

टॅग्स :fundsनिधीOsmanabadउस्मानाबादMember of parliamentखासदार