उस्मानाबादमध्ये अडीच लाखांचा गुटखा, सुंगधी तंबाखु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 19:47 IST2018-12-11T19:46:38+5:302018-12-11T19:47:12+5:30

शिराढोण पोलिसांत आरोपी नितीन आगाडेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़.

In Osmanabad, Gutkha, Sugandhi Tobacco was caught by two and a half lakhs | उस्मानाबादमध्ये अडीच लाखांचा गुटखा, सुंगधी तंबाखु पकडली

उस्मानाबादमध्ये अडीच लाखांचा गुटखा, सुंगधी तंबाखु पकडली

उस्मानाबाद : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखुची वाहतूक सुरु असताना एका वाहनावर केलेल्या कारवाईत अडीच लाखांचा मुद्देमाल सापडला आहे़ याप्रकरणी सोमवारी रात्री शिराढोण पोलिसांत एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

कळंब येथील नितीन जनार्दन आगाडे हा त्याच्या ताब्यातील एमएच २५ पी ४८६६ क्रमांकाच्या जीपमधून प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखुची वाहतूक करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती़ याअनुषंगाने सोमवारी दुपारी अन्न सुरक्षा अधिका-यांनी चौसाळा येथे ही जीप थांबवून झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित विविध कंपन्यांच्या गुटख्याची, पान मसाला तसेच सुगंधी तंबाखुची पाकिटे, बॉक्स आढळून आली़ अन्न सुरक्षा अधिका-यांनी जीप ताब्यात घेऊन प्रतिबंधित मालाची मोजदाद केली असता २ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे स्पष्ट झाले़ याअनुषंगाने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिराढोण पोलिसांत आरोपी नितीन आगाडेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़.

Web Title: In Osmanabad, Gutkha, Sugandhi Tobacco was caught by two and a half lakhs