पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'ने धडा शिकवला; उमरग्यात फटाके फोडून जल्लोष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:05 IST2025-05-07T16:59:08+5:302025-05-07T17:05:02+5:30
शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला

पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'ने धडा शिकवला; उमरग्यात फटाके फोडून जल्लोष!
उमरगा : पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यदलाने घेतला असून आज पहाटे एयरस्ट्राइक करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ठिकाणे उद्ध्वस्त केले आहेत. सैन्याच्या या जोरदार कारवाईस 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. या हल्ल्याचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे. उमरग्यात भाजपच्यावतीने शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भारतीय सैन्य दलाने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानातील अतिरेकी ठिकाणांवर तुफानी हल्ला केला. पहेलगाम येथील पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्याला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले जोरदार प्रत्युत्तर असल्याच्या भावना व्यक्त करत भाजपच्यावतीने शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करून देशभक्तीपर घोषणा देत भारतीय सैन्यदलाच्या धाडसाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. भाजप पदाधिकारी, नागरिकांनी दिलेल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या जोरदार घोषणानी परिसर निनादून गेला होता.
यावेळी डॉ. कपिल महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, ज्येष्ठ नेते सुनील कुलकर्णी, शहर मंडल अध्यक्ष अॅड. साईराज टाचले, संतोष वकारे, डॉ. सचिन तावशीकर, संदीप चौगुले, अॅड. काशिनाथ राठोड, अनिल सगर, विक्रम मस्के, व्यापारी महासंघ उमरगाचे सचिव शिवप्रसाद लड्डा, मनीष सोनी, श्रीधर ढगे, नितीन नांगरे, समर्थ दंडगे, संजीवन कुंभार, महेश पाटील, महादेव भोसले, संजीव विभुते, रामदास कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.