तुळजापुरात पैशाच्या वादातून एकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:48 IST2018-09-25T16:47:55+5:302018-09-25T16:48:47+5:30
पैसे देण्या-घेण्याच्या तक्रारीवरून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द सोमवारी रात्री तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापुरात पैशाच्या वादातून एकाचे अपहरण
तुळजापूर (उस्मानाबाद ) : पैसे देण्या-घेण्याच्या तक्रारीवरून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द सोमवारी रात्री तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ सप्टेंबर रोजी तुळजापूर शहरात घडली़
तुळजापूर शहरातील वेताळ नगर भागात राहणाऱ्या मनिषा अनिल धुमाळ यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ त्यांच्या पतीला पैसे देणे घेण्याच्या तक्रारीवरून पाच जणांनी शहरातील धनश्री हॉटेलमधून फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून राधे बापू पवार, सचिन लांडगे, अमोल शेंडगे, संतोष चौधरी, अमीर शेख (सर्व रा.तुळजापूर) या पाच जणांविरूध्द कलम ३६५, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास फौजदार योगेश खटाने करीत आहेत.