आता खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST2021-08-17T04:37:50+5:302021-08-17T04:37:50+5:30

उमरगा : दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या भावात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. शिवाय, ...

Now 25 per cent increase in private passenger vehicles | आता खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ

आता खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ

उमरगा : दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या भावात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. शिवाय, खासगी वाहनचालकांना भाडेवाढ करणे अपरिहार्य ठरले असून, सध्याचे इंधनाचे दर पाहता खासगी वाहनचालकांनी भाड्यामध्ये २५ टक्के दरवाढ केली आहे.

सन २०१९ पासून आतापर्यंत पेट्रोलमध्ये ३० तर डिझेलच्या किमतीत तब्बल २६ ते २७ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. महागाईने उग्र रूप धारण केले आहे. खासगी वाहनचालकांनाही २५ ते ३० टक्क्यांनी दरवाढ केली आहे. परिणामी याचा सर्वांत जास्त फटका खासगी वाहन करून प्रवास करणाऱ्या ग्राहकांना बसत आहे. त्यांना इच्छितस्थळी जाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

(असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर)

जानेवारी २०१९ पेट्रोल- ७८.४४ डिझेल ७०.३२

जानेवारी २०२० पेट्रोल ८१.२९ डिझेल ७०.७०

जानेवारी २०२१ पेट्रोल ९०.९३ डिझेल ७९.८१

ऑगस्ट २०२१ पेट्रोल १०८.२४ डिझेल ९६.३८

(प्रवासी वाहनांचे दर)

खासगी कार १२ रुपये प्रति किमी

मालवाहतूक टेम्पो १० ते १२ रुपये प्रति किमी

टमटम ५ ते १० रुपये वाढ

ॲटोरिक्षा ५ ते १० रुपये वाढ

इंधन दरवाढीमुळे भाड्यात वाढ केल्याने ग्राहक बस, रेल्वे अथवा इतर स्वस्त गाड्यांचे पर्याय स्वीकारत आहेत. आम्हाला कमी भाडे घेणे परवडणारे नाही. यामुळे व्यवसायावर परिणाम झाला असून, व्यवसाय होत नसल्याने गाडीचे हप्ते भरणे शक्य होत नाहीये.

- राजू तळिखेडे, वाहनचालक

उदरनिर्वाह चालविण्यासाठी चारचाकी वाहन हप्त्यावर घेतले. परंतु, इंधन दरवाढीमुळे नाईलाजाने भाडेवाढ करावी लागली असून, ग्राहक जादा दर द्यायला तयार नाहीत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. दरवाढ कमी करणे शक्य नाही. गाडीचे हप्ते कसे फेडावेत व उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न पडला आहे.

- धर्मा कांबळे,वाहनचालक

Web Title: Now 25 per cent increase in private passenger vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.