दोन वर्षांपासून दमडी नाही, आतातरी विकासाला निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST2021-08-17T04:38:09+5:302021-08-17T04:38:09+5:30
उस्मानाबाद : नगरपालिकेच्या अंतर्गत येणा-या आपल्या प्रभागाला मागील दोन वर्षांत एक दमडीही देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रभागातील विकासकामे ठप्प ...

दोन वर्षांपासून दमडी नाही, आतातरी विकासाला निधी द्या
उस्मानाबाद : नगरपालिकेच्या अंतर्गत येणा-या आपल्या प्रभागाला मागील दोन वर्षांत एक दमडीही देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रभागातील विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे आता डीपीसीतूनच निधी उपलब्ध करून द्यावा, असे साकडे शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी रविवारी पालकमंत्र्यांकडे घातले.
उस्मानाबाद शहरातील शिवसेना नगरसेवक सुरज साळुंके व रूपाली आसलेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या प्रभागाला मागील दोन वर्षांमध्ये विकासकामांसाठी एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता यापुढच्या डीपीसी बैठकीत प्राधान्याने आपल्या प्रभागातील पांढरी स्मशानभूमी नूतनीकरण करणे, विजय चौक ते तुपे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे, कुंभार गल्ली, नाना मैराण यांचे घर ते वाघमोडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे, राम मंदिर ते लोहार मशीद सिमेंट काँक्रीट व नाली करणे, संपत डोके यांच्या घरापासून ते ननवरे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, खरोसेकर यांच्या घरापासून ते भोसरेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, तर देशपांडे गिरणी चौक ते नेहरू चौक रस्ता व सिमेंट काँक्रीट नाली करणे तसेच राजेंद्र पेठे यांच्या घरासमोर सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, युनूस शेख यांच्या घरापासून ते बालाजी राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, महादेव मंदिरासमोरील पुलाला आरसीसी कंपाउंड वॉल व आरसीसी भिंत बांधकाम करणे व जयंत महाजन यांच्या घरापासून ते जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे या कामासाठी ३ कोटी ४८ लाख रुपये निधीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. प्रभागातील विकासकामे करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक सुरज साळुंके व रूपाली आसलेकर यांनी केली आहे.