शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी आक्रमक; तामलवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको

By गणेश कुलकर्णी | Updated: August 25, 2023 20:23 IST

शासनाने दुष्काळ जाहीर करावा तसेच थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, थकीत पीकविमा वाटप करावा, कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी टोल नाक्यावर शुक्रवारी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तालुक्यात २५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने पिके करपून चालली आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर करावा तसेच थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी, कांदा निर्यातीवर लादलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे, आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांसमवेत तालुकाध्यक्ष धैर्यशिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यात तुळजापूर विधानसभा अध्यक्ष शिवाजी सावंत, अशोक जाधव, सिकंदर बेगडे, ग्रा. पं. सदस्य सतीश माळी, हनमंत गवळी, तौफिक शेख, सत्यजित देशमुख, महेश गुंड, अमोल पाटील, आनिल शिंदे, पंडित काळे, संदीप गंगणे, बबन ढगे, प्रदीप साळुंके, नजीब काझी, किसन पांडागळे याच्यासह तामलवाडी, सुरतगाव, नांदुरी, मांळुब्रा, काटी आदी गावातील शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.चौकट

गळ्यात घातल्या कांद्याच्या माळायावेळी कांदा निर्यातीवर आकारले जाणारे शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी कार्यकर्ते गळ्यात कांद्याच्या माळा घालून रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनामुळे अर्धा तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी