आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:25+5:302021-07-18T04:23:25+5:30
दृष्टिक्षेपात संख्या... जिल्ह्यातील एकूण शाळा ६४० सुरू झालेल्या शाळा २२७ सुरू न झालेल्या शाळा १९ काेट.... काळजी आहेच, पण ...

आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत
दृष्टिक्षेपात संख्या...
जिल्ह्यातील एकूण शाळा
६४०
सुरू झालेल्या शाळा
२२७
सुरू न झालेल्या शाळा
१९
काेट....
काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे आहे...
१. आमच्या गावातच शाळा आहे. सध्या गावात एकही काेराेनाचा रुग्ण नाही. त्यामुळे आमच्या गावातील शाळा सुरू झाली आहे. काेराेनाचा धाेका अद्यापि टळलेला नसल्याने काळजी आहे. परंतु, शिक्षणही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे आवश्यक खबरदारी घेऊन मुलास पहिल्याच दिवशी शाळेत पाठिवले. काेराेनाचा संसर्क टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन मुलांना शाळेत पाठविण्यास काहीच हरकत नाही.
-शामल नाईक, आई.
२. दाेन महिन्यापूर्वी आमच्या गावात पाच ते सात काेराेनाचे रुग्ण आढळून आले हाेते. त्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. मात्र, ग्रामपंचायत तसेच आराेग्य यंत्रणेकडून विविध उपाययाेजना करण्यात आल्या. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग अधिक वाढला नाही. मागील महिनाभरापासून एकही रुग्ण नाही. त्यामुळे गावातील शाळा सुरू झाली आहे. माझ्या मुलास पहिल्याच दिवशी शाळेत पाठिवले.
-रत्नमाला साेनावणे, आई.
३. राज्यातील काही जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. असे असतानाच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. आमच्या गावातील शाळा १५ जुलै राेजी सुरू झाली आहे. परंतु, मुलास शाळेत अद्याप पाठविले नाही. शिक्षकांचाही फाेन आला हाेता. त्यांनी शाळेने केलेल्या उपायाेजना सांगिल्या आहेत. त्यामुळे साेमवारपासून मुलीस शाळेत पाठिवणार आहे.
-दैवशाला कावळे, आई.
चाैकट...
शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघाेळही करा...
जिल्ह्यात काेराेना विषाणूचा संसर्ग पूर्वीच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्यामुळेच सध्या काेराेनामुक्त गावांतील आठवीपासून पुढील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. संसर्ग ओसरला असला तरी धाेका टळलेला नाही. त्यामुळे घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी कपडे बदलावेत. तसेच अंघाेळही करावी. साेबतच सॅनिटायझर, मास्कचा नियमित वापर करावा.
अ. शाळेत गेल्यानंतर मास्क काढू नये.
ब. वारंवार हात साबणाने धुवावा अथवा सॅनिटायझर वापरावे.
क. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
ड. शाळेच्या आवारात ग्रुप करून थांबू नये.