शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

माय-लेकीस चाकूचा धाक दाखवून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:54 PM

याप्रकरणी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी (उस्मानाबाद ) : शिक्षिकेस व तिच्या मुलीस चाकूचा धाक दाखवत अज्ञात चोरट्यांनी रोख पाच हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ८८ हजार रूपयांचा ऐवज लुटल्याची घटना शहरात रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी येथील रहिवाशी व इंदापूर येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका ज्योती मुरलीधर सुकाळे यांचे पोलिस ठाण्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ घर आहे. ३० मार्च रोजी त्या घरात वरच्या मजल्यावर झोपल्या होत्या, तर त्यांचे सासू-सासरे हे तळमजल्यावरील हॉलमध्ये झोपलेले होते. ३१ मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना घरात कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज आला. यामुळे त्या जाग्या होवून कॉटवर उठून बसल्या. यावेळी अचानक तीन इसम हातामध्ये धारधार शस्त्र घेऊ त्यांच्या जवळ आले. त्यांनी आवाज केला तर तुम्हाला जिवे मारू, अशी धमकी देत घरामध्ये जे काही आहे ते आमच्या हवाली करा, असे फर्मान सोडले. तसेच कपाटाच्या किल्लीची मागणी केली. ज्योती सुकाळे यांनी त्यांच्या मुलीस उठवून चोरट्यांना चावी देण्यास सांगितले. तसेच तुम्हाला जे न्यायचे ते न्या, मात्र आम्हाला मारू नका, अशी विनवणी केली. चोरट्यांना कपाटाची किल्ली मिळताच कपाटातील तसेच ज्योती सुकाळे व मुलगी नयना यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.

यानंतर हे चोरटे हे हॉलचा कडी-कोयंडा पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये आल्याचे ज्योती सुकाळे यांनी पोलिसांना सांगितले. ज्योती सुकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, घटनास्थळास पोलिस निरीक्षक सतिश चव्हाण यांनी भेट देऊन तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली आहे.  या घटनमुळे शहरवासियांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

चोरीची दुसरी घटना टळलीया घटनेनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा इंदापूर रोडवरील डॉ. अमर तानवडे यांच्या घराकडे वळविला. येथे चोरट्यांनी तानवडे घरात प्रवेश केला. मात्र डॉक्टरांच्या पत्नी जाग्या झाल्यावर त्यांनी आरडाओरड केल्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे चोरीची ही घटना टळली. दरम्यान, तानवडे यांनी घटनेची माहिती पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसही तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, चोरटे पसार झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबादPoliceपोलिसtheftचोरी