उपजिल्हा रुग्णालयासाठी नळदुर्गात मनसेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST2021-08-17T04:37:58+5:302021-08-17T04:37:58+5:30

२०१७ पासून नळदुर्ग-तुळजापूर रोडवर उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून, अद्याप ते पूर्णत्वास गेले नाही. त्या अनुषंगाने मनसेने प्रशासनाचे लक्ष ...

MNS fast at Naldurg for sub-district hospital | उपजिल्हा रुग्णालयासाठी नळदुर्गात मनसेचे उपोषण

उपजिल्हा रुग्णालयासाठी नळदुर्गात मनसेचे उपोषण

२०१७ पासून नळदुर्ग-तुळजापूर रोडवर उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून, अद्याप ते पूर्णत्वास गेले नाही. त्या अनुषंगाने मनसेने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. उपोषणकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांना दिले. त्यात नळदुर्ग शहरासह परिसरातील ६० ते ७० गावांतील जवळपास दीड लाख लोकांना या उपकेंद्राचा फायदा होणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सूचनेनुसार या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुल्ला यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना या महिनाअखेर रुग्णालय सुरु करू, असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, जनहित कक्ष विधि विभागाचे ॲड. मतीन बाडेवाले, तालुका सरचिटणीस गणेश पाटील, उपतालुकाध्यक्ष आकाश पवार, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, शहर संघटक रवी राठोड, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, तुळजापूर मनविसे शहराध्यक्ष ऋषी माने, शहर सचिव आवेज इनामदार, सूरज अंगुले, अजित कांबळे, संदीप वैद्य, निखिल येडगे, मारुती पांचाळ आदी उपस्थित होते.

Web Title: MNS fast at Naldurg for sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.