शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

मराठवाड्याची 'शिवाकाशी' तेरखेडाच्या फटाक्यांना बसला बंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 5:59 PM

पावसाळ्यातील काही महिने वगळता वर्षभर येथे  फटाका निर्मिती सुरू असते.

ठळक मुद्देतेरखेडा हे फटाका उत्पादनासाठी राज्यभर परिचित आहे.येथे फटाके निर्मितीचे १८ कारखाने आहेत.

- मधुकर राऊत

तेरखेडा (जि.उस्मानाबाद) : मराठवाड्याची शिवाकाशी समजल्या जाणाऱ्या तेरखेडाच्या फटाका उद्योगाला यंदा जबर झळ बसली आहे. आधी कोरोनामुळे ७ महिने उत्पादन ठप्प होते. आता ठिकठिकाणी बंदीचे निर्णय होत असल्याने संभ्रमित व्यापाऱ्यांनी ३० टक्केही मागणी नोंदवलेली नाही. 

तेरखेडा हे फटाका उत्पादनासाठी राज्यभर परिचित आहे. येथे फटाके निर्मितीचे १८ कारखाने आहेत. पावसाळ्यातील काही महिने वगळता वर्षभर येथे  फटाका निर्मिती सुरू असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे ७ महिने उत्पादन प्रक्रिया ठप्प होती. दिवाळीच्या तोंडावर परवानगी मिळाल्यानंतर दोन महिन्यांत शक्य तितके उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न कारखानदारांनी केला. तरीही दरवर्षीपेक्षा यंदा ३० टक्केच उत्पादन करता आले. दरम्यान, आता अनलॉकमुळे फटाक्यांना उठाव  येईल, अशी अपेक्षा कारखानदारांना होती. मात्र, मध्येच फटाकाबंदीचा निर्णय ठिकठिकाणी घेण्यात येत असल्याने अद्याप व्यापारी, विक्रेत्यांकडून पुरेशी मागणीच आली नाही. त्यामुळे आता फटाके पडूनच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

फटाकेबंदीबाबत संभ्रमकोरोनामुळे फटाके निर्मितीवर मर्यादा आल्या. दोन महिनेच मिळाले. त्यातही अतिवृष्टीने नुकसान झाले. आता फटाके बाजारात आले तरी ग्राहक नाहीत. शिवाय, फटाकेबंदीबाबत संभ्रम निर्माण झाल्याने व्यापारीही मागणीसाठी पुढे येईनात. यामुळे  आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. - फरीद पठाण, अध्यक्ष, फटाका कारखाना असोसिएशन

रोजगारावर मर्यादा आलीकोरोना महामारीमुळे ७ महिने कारखाने बंद असल्याने रोजगार बुडाला. उसनवारीवर संसार चालवले. आता मागणी कमी असल्याने उत्पादनही कमी केले जात आहे. त्यामुळे पुन्हा रोजगारावर मर्यादा आली आहे. दुसरीकडेही कोठे सध्या कामे नाहीत. - समाधान सरवदे, फटाका कामगार

टॅग्स :fire crackerफटाकेOsmanabadउस्मानाबादDiwaliदिवाळी 2022