शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मानेवाडी सरपंच, उपसरपंचाविरूद्ध अविश्वास ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST

तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी २०१७ शांताबाई बाबू सगट या निवडून आल्या होत्या. त्यानंतर दीड वर्षाने म्हणजेच १३ ...

तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी २०१७ शांताबाई बाबू सगट या निवडून आल्या होत्या. त्यानंतर दीड वर्षाने म्हणजेच १३ जून २०१९ रोजी उपसरपंचपदी मनोहर यशवंत माने यांची निवड झाली होती. सरपंच व उपसरपंच या दोघांनीही आपल्या कार्यकाळात बेकायदेशीर प्लॉट विक्री, सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे, ग्रामपंचायत व्यवहारात अनियमितता आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मांडलेले विषय न घेणे, अशा विविध कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी तक्रार करून अविश्वास ठराव मांडला होता. त्यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी मानेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाविरूद्ध १३ ऑगस्ट २०२० रोजी मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर गुप्त मतदान घेण्याकरिता गटविकास अधिकारी यांना आदेशित केले हाेते. विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २१ जानेवारी २०२१ रोजी गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत ५८७ इतके मतदान झाले. गुप्त मतदान प्रक्रियेत प्रथम सरपंचावरील अविश्वास ठरावासाठी ५८७ मतदान झाले. त्यापैकी ५७३ मते वैध तर १४ मते अवैध ठरली. यामध्ये सरपंचाच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने ३०० इतके मतदान झाले व त्याविरूद्ध २७३ इतके मतदान झाले. २७ मतांनी सरपंचाविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला. तर उपसरपंचावरील अविश्वासासाठी ५८७ मतदान झाले. यापैकी १० मते अवैध तर ५७७ मते वैध ठरली. अविश्वास ठरावाच्या बाजूने ३०२ इतके मतदान झाले तर अविश्वास ठरावाच्या विरूद्ध २७५ इतके मतदान झाले. उपसरपंचावरही २७ मतांनी ठराव पारित झाला. त्यामुळे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांनी सरपंच शांताबाई सगट व उपसरपंच मनोहर माने यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्याचे घोषित केले. आता नवीन सरपंच व उपसरपंचाची नियुक्ती करावी, अशी मागणी सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.