शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

Maharashtra Election 2019 : उस्मानाबादेत बंडखोरांना मिळाला‘वंचित’चा आधार;४ मतदारसंघांत ६० उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:08 PM

वंचित बहुजन आघाडीने बंडखोरांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे़

ठळक मुद्देसर्वाधिक गर्दी तुळजापुरातउस्मानाबादेत रंगत वाढलीउमरगा मतदारसंघ बंडखोरीला अपवाद 

- चेतन धनुरे 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या चांगलीच वाढली आहे़ तब्बल ६० उमेदवार आता रिंगणात राहिले असून, सर्वाधिक गर्दी ही तुळजापुरात झाली आहे़ येथून १८ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत़ दरम्यान, तीन मतदारसंघात बंडखोरी झाली असून, यातील दोन ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने बंडखोरांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे़

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत तुळजापुरात होत आहे़ त्यामुळे येथे उमेदवारही सर्वाधिक आहेत़ येथे दोन माजी मंत्र्यांत लढत रंगली आहे़ काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण व भाजपचे राणाजगजितसिंह पाटील हे आमने-सामने आले आहेत़ याशिवाय, राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे यांनी बंड पुकारुन ‘वंचित’ची उमेदवारी मिळवली़ तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गटनेते महेंद्र धुरगुडे यांनीही बंडखोरी करीत प्रहार पक्षाकडून शड्डू ठोकला आहे़ मनसेचे प्रशांत नवगिरेही नशीब आजमावत आहेत़ मधुकरराव चव्हाण हे या मतदारसंघात दीर्घकाळ वर्चस्व राखून आहेत़ तर भाजपनेही यावेळी राणा पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलविण्यासाठी कंबर कसली आहे़

उस्मानाबादेत रंगत वाढलीउस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर, वंचित बहुजन आघाडीचे धनंजय शिंगाडे, संभाजी ब्रिगेडचे डॉ़संदीप तांबारे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ दरम्यान, सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे व राष्ट्रवादीचे सुरेश पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून आपला अर्ज कायम ठेवला आहे़ त्यामुळे येथेही रंगत निर्माण झाली आहे़ परंडा मतदारसंघात शिवसेनेचे प्रा़ तानाजी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश कांबळे व अन्य ७ जणांत लढत रंगली आहे़ सुरेश कांबळे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत वंचितची उमेदवारी पदरी पाडून घेतली आहे़ याशिवाय, जनता दलाचे अ‍ॅड़रेवण भोसले, कॅ़संकेत चेडे यांनी दंड थोपटल्याने चुरस वाढली आहे़ प्रा़तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री आहेत़ तर राहुल मोटे हे सलग तिसºयांदा  विजयी झाले आहेत़ त्यामुळे  परंड्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़

उमरगा मतदारसंघ बंडखोरीला अपवाद उमरगा मतदारसंघात बंडखोरीला अपवाद ठरला आहे़ येथे शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले, काँग्रेसचे दिलीप भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे रमाकांत गायकवाड, मनसेचे जालिंदर कोकणे यांच्यासह इतर सहा जण रिंगणात आहेत़ विद्यमान आमदार चौगुले हे या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झाले आहेत़ त्यांना रोखण्यासाठी विरोधकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार, हे निश्चित़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Osmanabadउस्मानाबादosmanabad-acउस्मानाबादtuljapur-acतुळजापूरumarga-acउमरगाparanda-acपरांडा