शहरं
Join us  
Trending Stories
1
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
2
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
3
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
4
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
5
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
6
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
7
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
8
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
9
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
10
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
11
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
12
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
13
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
15
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
16
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
17
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
18
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
19
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
20
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
Daily Top 2Weekly Top 5

जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: May 30, 2014 00:26 IST

तामलवाडी : अवकाळी पाऊस वादळी वार्‍याच्या तडाख्याने हतबल झालेल्या तुळजापूर तालुक्यातील केमवाडी गावचे जनजीवन गुरुवारी विस्कळीत झालेले होते.

 तामलवाडी : अवकाळी पाऊस वादळी वार्‍याच्या तडाख्याने हतबल झालेल्या तुळजापूर तालुक्यातील केमवाडी गावचे जनजीवन गुरुवारी विस्कळीत झालेले होते. घरावरील पत्रे उडून घरात साचलेल्या पाण्यातच महिलांना स्वयंपाक करावा लागला. नैसर्गिक आपत्तीच्या सावटाखाली गावकरी वावरत होते. महसूल प्रशासनाने पंचनामे करण्यासाठी चार तलाठी कर्मचार्‍यांना केमवाडीत दाखल केले. दिवसभर पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. बुधवारी दुपारी ३ वाजता वादळी वार्‍याने केमवाडी येथे थैमान घातले. गारांच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ५० घरावरील पत्रे उडाल्याने घरात आडोसा नव्हता. चिखलात चूल पेटवून स्वयंपाक करावा लागला. तर घरासमोरील उन्मळून पडलेली झाडे हटविण्याचे काम चालू होते. विजेचे खांब पडल्याने गेल्या ३० तासांपासून गावचा वीज पुरवठा खंडित झाला असून, पाणीपुरवठाही बंद पडला आहे. वादळात उडालेले पत्रे सापडत नसल्याने घर कसे झाकावे या विचारात संतोष शिंदे कुटुंबिय होते. वादळी पावसात विश्वनाथ शिंदे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले होते. उभ्या आयुष्यात असले वादळी वारे पाहिले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद शाळेवरील पत्रेही वार्‍याने उडून गेले आहेत. गुरुवारी सकाळी नायब तहसीलदार बी.यु. वाघे, महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी केमवाडीस भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर तलाठी चंद्रकांत कसाब, टी. के. रुपनवार, ए. जी. भातभागे, बी.ए. माचने यांनी केमवाडीतील पंचनामे करण्यासाठी पाचाराण करण्यात आले होते. हे काम युद्ध पातळीवर सुरु होते. मात्र गावकर्‍यांची भिती स्पष्टपणे जाणवत होती. निवार्‍याअभावी बेघर झालेल्या कुटुंबांना आसरा द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) वादळी तडाख्याने पाच गावांना फटका फेब्रुवारी महिन्यापासून अवकाळी पावसाचा फटका आजवर पिंपळा (खुर्द), वडगाव (काटी), आरळी (बु), भातंब्री, जळकोटवाडी, केमवाडी, गवळेवाडी गावाला बसला आहे. या पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेचे खांब, ट्रान्सफार्मर कोसळले आहेत. फळबागाही भुईसपाट झाल्या आहेत. या नैसर्गिक संकटातून सावरताना शेतकरी, बेघर कुटुंबांना कसरत करावी लागत आहे.