उमरग्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST2021-08-15T04:33:53+5:302021-08-15T04:33:53+5:30

यावेळी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत २ कोटी २० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पूरहानी दुरुस्ती योजनेतून दीड ...

Launch of various development works in Umarga | उमरग्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ

उमरग्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ

यावेळी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत २ कोटी २० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पूरहानी दुरुस्ती योजनेतून दीड कोटी रुपयांच्या जेवळी-येणेगूर रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन, जेवळी ग्रामपंचायत अंतर्गत ४० लाख रुपयांचे विविध विकासकामांचे लोकार्पण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १ कोटी ८६ लक्ष रुपयांचे जकेकूर ते राजेभास्कर रस्त्याचे भूमिपूजन, जिल्हा वार्षिक योजनेतून तयार पतंगे रोडचे व उमरगा शहरातील इतर अंतर्गत ८ कोटी ५० लक्ष रुपयांच्या तयार रस्त्यांचे लोकार्पण व कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा येथील हमाल भवन व प्रवेशद्वाराचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी खा. प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, युवा नेते किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, तालुकाप्रमुख तथा सरपंच जेवळी मोहन पनुरे, गजानन शिंदे, मुख्याधिकारी लोहारा, रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी उमरगा, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, संतोष सगर, बाजार समिती संचालक सचिन जाधव, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, बसवराज वरनाळे, शेखर मुदकाण्णा, शरद पवार, योगेश तपसाळे, बळीराम सुरवसे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अजित चौधरी, गोपाळ जाधव, पतंगे रोड रहिवासी संघर्ष समितीचे मनोज जाधव, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, नगरसेवक इरप्पा घोडके, संजय पवार, बाजार समितीचे सर्व संचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Launch of various development works in Umarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.