मस्सा येथील विकास कामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST2021-08-17T04:37:43+5:302021-08-17T04:37:43+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी २२ लाख रुपये, गाळा लाईन क्रं. ३ साठी १५ लाख ४ साठी ३० ...

मस्सा येथील विकास कामांचा शुभारंभ
येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी २२ लाख रुपये, गाळा लाईन क्रं. ३ साठी १५ लाख ४ साठी ३० लाख, तसेच सिमेंट कॉंक्रिट रस्ता या कामासाठी ७२ लाख रुपये व पंचायत समिती सदस्या संगीता शिंदे यांच्या १५ व्या वित्त आयोगातून गावांतर्गत पाईपलाईनसाठी दीड लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामांचे पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यानंतर व्यापारी संकुलाचे लोकार्पण, नवीन स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास आ. कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे कळंब तालुका प्रमुख शिवाजी कापसे, उपविभागीय अधिकारी अहिल्या गटाळ, तहसीलदार रोहन शिंदे, गटविकास अधिकारी मोहन राऊत, सरपंच प्रा. राजश्री धनंजय वरपे, उपसरपंच विश्वनाथ तांदळे, पंचायत समिती सदस्या संगीता सतीश शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष विक्रम वरपे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता सावंत, अक्षय माळी, माजी सरपंच विष्णू बांगर, धनंजय वरपे, अनिल वरपे, बापूराव थोरात, नितीन सावंत, दादा थोरात, प्रशांत बांगर, मनोजकुमार थोरात, प्रा. अमोल शिंगटे, मधुकर वरपे, श्रीकांत वरपे, बापूराव थोरात, हरिश्चंद्र तावस्कर, अशोक वरपे, श्रीकांत वरपे, उमेद महिला बचत गटाच्या स्वाती सावंत, सविता थोरात व ग्राम विकास अधिकारी ए. बी. वाघमारे आदी उपस्थित होते.