शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी तूर्त थंडबस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:52 IST

राजू शेट्टींसह शेतकऱ्यांच्या आक्रमकते पुढे जिल्हा प्रशासनाची मवाळ भूमिका

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी शिवारात बुधवारी (दि. २५) शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीस विरोध केला. यावेळी पोलिसांसोबत झटापट झाली. या प्रकरणानंतर लागलीच गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यालयात अधिकाऱ्यांसमोर शेट्टी यांनी शक्तिपीठबाबत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मवाळ भूमिका घेत महामार्गाची मोजणी तूर्त थांबवल्याचे स्पष्ट केले.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली, असून जमीन मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी पथक पाहणीसाठी गेले होते, शेतकऱ्यांनी परतवून लावले होते. बुधवारी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह एक पथक वाणेवाडी शिवारात मोजणीसाठी गेले. तेव्हा शेतकरी व पोलिसांत झटापट झाली. यानंतर पथक मोजणीविना माघारी फिरले. दरम्यान, गुरुवारी सकाळी राजू शेट्टी यांनी संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. बैठकीमुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नसल्याने अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासमवेत शेट्टी यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या व्यथा सांगून जमीन मोजणी रद्द करण्याची मागणी केली. यावर ज्योती पाटील यांनी तूर्त मोजणी प्रक्रिया थांबवली असल्याचे स्पष्ट केले.

समुद्रात महामार्ग बांधा : राजू शेट्टीशेतकऱ्यांनी मेहनतीने जमिनी कसून त्या बागायती केल्या. चांगल्या जमिनी महामार्गात जाणार असून यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील. दर जाहीर न करता केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. तुम्हाला महामार्ग करायचाच असेल, तर तिकडे समुद्रात बांधा, असा सल्ला शेट्टी यांनी सरकारला दिला.

लोणीकर चावडीवर या, हिशेब सांगतोआ. बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना शेट्टी म्हणाले, यांना सत्तेचा माज चढला आहे. शेतकऱ्यांना दिलेले ६ हजार तुम्ही काढणार असाल, तर मी हिशेब घेऊन चावडीवर येतो. या चर्चा करूया. केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन दर कमी होऊन शेतकऱ्यांना एका वर्षात ३५ ते ४० हजार कोटींचा फटका बसला. ४०० रुपयांचे डीएपी खत २ हजाराला केले. सगळाच हिशेब सांगतो, तुम्ही याच, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :dharashivधाराशिवShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी