नालंदा बुध्द विहारात जिजाऊ जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST2021-01-14T04:27:00+5:302021-01-14T04:27:00+5:30
तुळजापूर : तालुक्यातील कुंभारी येथील नालंदा बुद्ध विहारामध्ये पोलीस पाटील विठ्ठल वडणे व त्यांच्या पत्नी रुक्मिणी वडणे तसेच ...

नालंदा बुध्द विहारात जिजाऊ जयंती साजरी
तुळजापूर : तालुक्यातील कुंभारी येथील नालंदा बुद्ध विहारामध्ये पोलीस पाटील विठ्ठल वडणे व त्यांच्या पत्नी रुक्मिणी वडणे तसेच ॲड. मैना नारायण वडणे, पंचशिला भालेराव, सारिका प्रभाकर दिलपाक, रेश्मा संकेत दिलपाक, बाबूराव दिलपाक, संतोष वडणे, किसन दिलपाक, समाधान दिलपाक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ तसेच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी विठ्ठल वडणे तसेच बाबूराव दिलपाक यांनी विचार मांडले. यावेयी मुलींमध्ये अनन्या लोहार, वैभवी दिलपाक,श्रद्धा धनके, कल्याणी कुंभार, संध्या कुंभार, संध्या वडणे, वीरज्ञा वडणे, गायत्री जगताप तर मुलांमध्ये स्वप्नील पारधे, बाळकृष्ण जगताप, गणेश वडणे, हर्षद दिलपाक यांनी जिजाऊंचे विचार व कार्य मांडले. या सर्वांचा विश्वजीत दिलपाक यांच्याकडून बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन नंदिनी लोहार या मुलीने केले.