शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

उस्मानाबादमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 19:24 IST

अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून भत्ते लागू करावेत, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने उस्मानाबादेत सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले़ 

ठळक मुद्देअंगणवाडी सेविका, मदतनिसांनी केली जोरदार घोषणाबाजी शासकीय धोरणांचा केला निषेध करत केले जेलभरो आंदोलन 

उस्मानाबाद : अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून भत्ते लागू करावेत, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने उस्मानाबादेत सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले़ 

शहरातील जिल्हा परिषद इमारतीसमोर ‘कोण म्हणंत देत नाही’, ‘आवाज दो- हम एक है’, ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस संघाचा विजय असो’, अशा घोषणा देत शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला़ यावेळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी मागदर्शन केले़ जेलभरो आंदोलनासाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनिसांनी सकाळपासून गर्दी केली होती़ रणरणत्या उन्हातही महिलांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला

त्यानंतर महाराणा प्रताप चौकात घोषणाबाजी करण्यात आली़ आंदोलनानंतर पोलिसांनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ यावेळी महासंघाचे राज्य संघटक दत्ता देशमुख, राज्य सचिव प्रभावती गायकवाड, बापू शिंदे, सुरेखा ठाकूर, सुनिता कदम यांच्यासह शेकडो अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनिसांची उपस्थिती होती़

अशा आहेत मागण्याअंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून,  शासनाचे सर्व भत्ते द्यावेत, केंद्र सरकारच्या २० सप्टेंबर २०१८ च्या मानधनात वाढ करण्याच्या अधिसूचनेची अमंलबजावणी विनाविलंब करावी, केरळ, दिल्ली, हरियाणा, तेलंगाणा, मध्यप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती रक्कम तिपटीने वाढवावी, वर्षातून १५ दिवसांची पगारी, आजारपणाची व उन्हाळ्यामध्ये एक महिन्याची पगारी रजा द्यावी यासह इतर विविध मागण्या जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़

टॅग्स :agitationआंदोलनSchoolशाळाjailतुरुंग