शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

तो झालाय गंभीर, अन् तुम्ही...? कोरोनाचे उपचार घेणाऱ्या ८४ पैकी ५४ रुग्ण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 11:04 PM

Corona virus in Usmanabad : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यानेही हलगर्जीपणा वाढला. हीच बाब आता पुन्हा एकदा अडचणींच्या दाढेत लोटणारी ठरत आहे.

ठळक मुद्देमागील महिन्याच्या तुलनेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जवळपास ४८ टक्क्यांनी वाढले आहे. केवळ रुग्णच वाढत आहेत, असे नाही तर बाधित रुग्णांची धोक्याची पातळी वाढली

उस्मानाबाद : कोरोनाचा उद्रेक घटला म्हणून बेफिकीर झालात की काय ? थांबा... हा उद्रेक पुन्हा वाढतोय. केवळ रुग्णांची संख्या वाढतेय असे नाही, तर त्याहून गंभीर प्रकार आता समोर आला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तब्बल ६५ टक्के रुग्ण हे गंभीर आहेत. ही मोठी धोक्याची घंटा आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याने बराच काळ कोरोनाला रोखून धरले होते. मात्र, एकदा शिरकाव झाला अन् मग कहरच झाला. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या बाबींचे पालन पुरेसे झाले नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रचंड मोठा उद्रेक झाला. पाहता पाहता संख्या १५ हजारांवर गेली. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण आले होते. रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली. त्यामुळे कोविड सेंटर्स ओस पडले. ही मोठीच समाधानाची बाब. मात्र, यामुळे नागरिकांतील बेफिकिरी इतकी वाढली की, जणू कोरोना आता माघारी येणारच नाही. शिवाय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यानेही हलगर्जीपणा वाढला. हीच बाब आता पुन्हा एकदा अडचणींच्या दाढेत लोटणारी ठरत आहे.

डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण हे लक्षणीय घटले होते. हे प्रमाण सरासरी १७ इतके होते. आता गेल्या काही दिवसांत हे प्रमाण सरासरी २५ वर पोहोचले आहे. म्हणजेच मागील महिन्याच्या तुलनेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जवळपास ४८ टक्क्यांनी वाढले आहे. केवळ रुग्णच वाढत आहेत, असे नाही तर बाधित रुग्णांची धोक्याची पातळी वाढली आहे, हे अधिक गंभीर आहे.

अशी वाढली धोक्याची पातळी....शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण उपचाराखालील रुग्णांची संख्या ही १०३ इतकी होती. यातील १९ जण घरीच उपचार घेत आहेत, तर ८४ रुग्ण काेविड सेंटर्समध्ये दाखल आहेत. यापैकी ३३ रुग्ण हे ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. २१ रुग्ण थोडे अधिक गंभीर असल्याने आयसीयूत दाखल करण्यात आले आहेत, तर शनिवारीच तिघेजण प्रकृती प्रचंड खालावल्याने व्हेंटिलेटरवर गेले.

४० टक्के : डिसेंबर महिन्यात गंभीर रुग्ण६८ टक्के : चार दिवसांतील गंभीर रुग्ण

गंभीर रुग्ण असे वाढले...डिसेंबर महिन्यातील ३० दिवसांत एकूण ५३३ रुग्णांची भर पडली. हे प्रमाण दररोज सरासरी १७ रुग्ण इतके होते. शिवाय, उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांपैकी गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांची संख्या ४० ते ४५ म्हणजेच जवळपास ४० टक्के इतकी होती. दरम्यान, मागील चार दिवसांत दररोज सरासरी २५ रुग्ण आढळून येत आहेत. म्हणजेच सरासरी ८ रुग्णांची रोज वाढ झाली आहे. यातील सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ६८ टक्के रुग्ण हे गंभीर आहेत. हे चिंताजनक आहे.

पुढील काही दिवस परिस्थितीवर नजर सध्या आढळून येत असलेल्या रुग्णांपैकी गंभीर असणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. पुढील काही दिवस आम्ही हा ट्रेंड नियमित तपासणार आहोत. जर हे प्रमाण असेच सुरू राहिले तर ते गंभीर असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर या किमान शक्य बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.-कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस