शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनी तोंडघशी, पीक विम्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात २३ दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात २३ दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. परिणामी, पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार २५ टक्के नुकसानभरपाई मिळू शकते. याच अनुषंगाने सोमवारी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आहे. हा आता नुकसानीचा पक्का पुरावा झाला असून, विमा कंपनीला आता नुकसानभरपाई द्यावीच लागणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे सर्वच मंडळांतील सोयाबीनचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान हे कळंब तालुक्यात झाले आहे. येथे उत्पन्नात सरासरी ६५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. तसेच भूम, परंडा, वाशी तालुक्यांतील काही मंडळात मूग व उडिदाचे तसेच परंडा तालुक्यातील काही मंडळात मका, बाजरी, तूर व कापसाचेही ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरला आहे. अशा शेतकऱ्यांना एकूण नुकसानभरपाईच्या २५ टक्के रक्कम आता पिकांच्या काढणीपूर्वी मिळणे शक्य आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीने नुकसानीबाबत उपस्थित केलेले विसंगत मुद्दे फेटाळून लावत सोमवारीच अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमुळे अग्रीम नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही अधिसूचना आता एकप्रकारचा पुरावाच झाला आहे. कंपनीने नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते आता निष्फळ ठरतील. याशिवाय, पुढे पुन्हा नैसर्गिक आपत्ती आली व खरीप पिकांचे नुकसान झाले तर पूर्ण विमा रक्कम पदरी पाडून घेण्यासाठीही ही अधिसूचना महत्त्वाची भूमिका बजावेल. शासनातर्फे विमा कंपनीशी करार करणारे कृषी सचिव या अधिसूचनेच्या आधारे कंपनीस नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देऊ शकतात.

कंपनीचा विरोध कशासाठी...

विमा कंपनीने जिल्ह्यातील खरीप पिकांचे ५० टक्के नुकसान झाल्याचा दावा नाकारला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ३० टक्केच नुकसान झाले आहे. मात्र, सर्वच लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांनीही तांत्रिक ज्ञान नसलेले विमा प्रतिनिधी तज्ज्ञ समिती सदस्यांचा दावा फेटाळू शकत नाहीत, हा मुद्दा उचलून धरला. तेव्हा कंपनीलाही नरमाईची भूमिका घ्यावी लागली. याच मुख्य मुद्यावर कंपनी तोंडघशी पडली अन् अग्रीम नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, पुढे आणखी नुकसान झाल्यास पूर्ण नुकसान भरपाई कंपनीला द्यावी लागेल. त्यावेळी आताची अधिसूचना आणि २५ टक्के रक्कम द्यावी लागल्याचा भक्कम पुरावा तयारी होईल, अशी भीतीही कंपनीला आहे.