निकृष्ट आहार वाटप, नागरिकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST2021-07-31T04:33:26+5:302021-07-31T04:33:26+5:30
कळंब -तालुक्यातील डिकसळ येथे एकात्मिक बालविकास कार्यालयांतर्गत एका बचत गटाच्या माध्यमातून लहान बालक व मातांना पोषण आहाराचे वाटप केले ...

निकृष्ट आहार वाटप, नागरिकांचे आंदोलन
कळंब -तालुक्यातील डिकसळ येथे एकात्मिक बालविकास कार्यालयांतर्गत एका बचत गटाच्या माध्यमातून लहान बालक व मातांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. हा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करीत कार्यालयासमोरच आहार ओतून महिलांनी शुक्रवारी आंदोलन केले.
बचत गटामार्फत जनावरेही खाणार नाहीत असा पोषण आहार दिला जातो आहे. यामुळे माता व बालकांचे आरोग्य धोक्यात येऊन अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे हा पोषण आहार परत घेऊन चांगल्या प्रकारचा आहार पुरवठा करावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी काही महिलांनी संबंधित बचत गटाकडून वितरित केलेला निकृष्ट दर्जाचा आहारही सोबत आणला होता. तो अधिकाऱ्यांना देऊन याबाबत बचत गटाला जाब विचारण्याची मागणीही त्यांनी केली. यानंतर पोषण आहाराची पाकिटे कार्यालयासमोर ओतून निकृष्ट पोषण आहार वाटपाचा निषेध नोंदविला. आंदोलनात मनिषा बनसोडे, दौलतबी पठाण, लैला शेख,रजिया शेख, शनौ शेख, नाजिया शेख, सतपाल बनसोडे सिद्धार्थ वाघमारे राहुल हौसलमल आदीनी सहभाग घेतला.
300721\img-20210730-wa0023.jpg
कळंब तालुक्यातील डिकसळ येथे निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी एकात्मिक बालविकास कार्यालयासमोर आहार ओतून निषेध आंदोलन केले.