शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'आतापर्यंतच्या आत्महत्या पुरेशा नसतील तर माझी भर चौकात हत्या करा, पण आरक्षण द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 18:16 IST

मराठा आरक्षणासाठी कळंबच्या युवकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कळंब : आजवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ६० समाजबांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या नसून, व्यवस्थेने केलेल्या हत्या आहेत, असा आरोप करत तालुक्यातील भाटशिरपुरा येथील एका २५ वर्षीय युवकाने माझी भरचौकात हत्या करा,पण मराठा आरक्षण द्या अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

मागच्या दोन अडीच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी शांततामय मार्गाने लढा उभा केला आहे. तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काहींनी टोकाची भूमिका घेत आत्महत्येचा मार्ग पत्करला. यातच तालुक्यातील भाटशिरपुरा येथील प्रतिक प्रकाश गायकवाड याने आरक्षणासाठी आतापर्यंतच्या आत्महत्या कमी वाटत असतील तर सरकारने माझी भर चौकात हत्या करावी पण आरक्षण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबतचे एक पत्र त्याने आज कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांना दिल्याने खळबळ उडाली आहे.

भरचौकात माझी हत्या करा,पण...मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्महत्या होतायत. तरीही समाजाच्या वेदना जाणून घेण्यास मायबाप सरकार कमी पडत आहे.  या आत्महत्या पुरेशा वाटत नसतील तर प्रशासनाने माझी भरचौकात हत्या करावी, पण मराठा समाजाला तात्काळ ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी प्रतीक याने केली आहे. कळकळीची विनंती आहे,बस्स झाल्या आत्महत्या.आरक्षण नसल्याने अनेक पिढ्या बरबाद होत आहेत. यामुळे अप्रत्यक्ष हत्या करण्यापेक्षा माझी प्रत्यक्ष हत्या करा, पण आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे