कळंब येथे जप्त केलेल्या पाच लाखाच्या गुटख्याची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 19:01 IST2018-12-01T18:58:53+5:302018-12-01T19:01:02+5:30

हा गुटखा १२ जानेवारी रोजी कळंब पोलिसांनी पकडला होता़

Holi of five lacs gutkha seized in Kalamb | कळंब येथे जप्त केलेल्या पाच लाखाच्या गुटख्याची होळी

कळंब येथे जप्त केलेल्या पाच लाखाच्या गुटख्याची होळी

कळंब (जि़उस्मानाबाद) : पोलिसांनी जप्त केलेला पाच लाखाच्या गुटख्याचे शनिवारी अन्न प्रशासनाने कळंब येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये दहन केले़ हा गुटखा १२ जानेवारी रोजी कळंब पोलिसांनी पकडला होता़

कळंब पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी एका वाहनावर कारवाई करून गुटखा, सुगंधी तंबाखू व तत्सम मुद्देमाल जप्त केला होता़ या प्रकरणात कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़ कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने पंचनामा करून गुटखा कळंब पोलीस ठाण्यात ठेवला होता़ जप्त केलेल्या गुटख्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ तसेच गुटख्याचे दहन करण्यासाठी वरिष्ठांकडे परवानगी मागण्यात आली होती़

वरिष्ठांच्या परवानगीनंतर कळंब पोलीस, नगर पालिका व अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी कळंब पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर या पाच लाखाच्या गुटख्याचे दहन केले़ यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, नमुना सहाय्यक अकोसकर, चालक नाना गाढवे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते़

Web Title: Holi of five lacs gutkha seized in Kalamb