भाजपाकडून स्थगिती अध्यादेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 06:00 PM2020-10-07T18:00:23+5:302020-10-07T18:00:59+5:30

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी राज्य शासनाने स्थगिती अध्यादेश काढल्याने या अध्यादेशाचा निषेध नोंदवित भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली़.

Holi of adjournment ordinance from BJP | भाजपाकडून स्थगिती अध्यादेशाची होळी

भाजपाकडून स्थगिती अध्यादेशाची होळी

googlenewsNext

उस्मानाबाद : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी राज्य शासनाने स्थगिती अध्यादेश काढल्याने या अध्यादेशाचा निषेध नोंदवित भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली़. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़.

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी सुधारणा विधेयक भारतातील सर्व राज्य सरकारांनी लागू केले असताना महाराष्ट्रातील शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस यांच्या सरकारने कृषी विधेयकाला स्थगिती देण्याचा अध्यादेश काढला. या अध्यादेशाचा विरोध दर्शविण्यासाठी राज्यातील भाजप आक्रमक झाली आहे़. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र सरकारच्या स्थगिती अध्यादेशाची जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थितीत होळी करण्यात करण्यात आली़.

यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, किसान मोर्चा मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा सरचिटणीस (संघटन) अ‍ॅड. नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्र्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी गरड, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष राहुल काकडे, तानाजी पाटील, योगेश जाधव, पूजा राठोड, अ‍ॅड़ कुलदीप भोसले आदींची यावेळी उपस्थिती होती़

 

Web Title: Holi of adjournment ordinance from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.