जय भवानी,जय शिवाजी! तुळजापुरात शिवजयंती सोहळा,'भवानी तलवार' महापूजेने भाविक मंत्रमुग्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:51 IST2026-02-19T16:51:34+5:302026-02-19T16:51:59+5:30

डोळे दिपवणारी पूजा! शिवजयंतीला भवानी तलवार महापूजेचे दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला

Historic Celebration at Tuljabhavani Temple: Special 'Bhavani Talwar' Puja Held on Chhatrapati Shivaji Maharaj Jayant | जय भवानी,जय शिवाजी! तुळजापुरात शिवजयंती सोहळा,'भवानी तलवार' महापूजेने भाविक मंत्रमुग्ध

जय भवानी,जय शिवाजी! तुळजापुरात शिवजयंती सोहळा,'भवानी तलवार' महापूजेने भाविक मंत्रमुग्ध

तुळजापूर (धाराशिव): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात गुरुवारी अत्यंत नेत्रदीपक आणि ऐतिहासिक 'भवानी तलवार अलंकार महापूजा' मांडण्यात आली. "जय भवानी, जय शिवाजी" आणि "आई राजा उदे उदे" या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, हजारो भाविकांनी या दर्शनाचा लाभ घेतला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेत्रदीपक महापूजा
शिवजयंतीनिमित्त पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. पंचामृत अभिषेक आणि दैनंदिन विधी संपन्न झाल्यानंतर महंत व भोपे पुजारी यांच्या हस्ते विशेष महापूजा मांडण्यात आली. या पूजेमध्ये देवीला भरजरी महावस्त्र आणि शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आले होते. विशेष आकर्षण म्हणजे, आई भवानी आपल्या दोन्ही हातात चांदीची तलवार धरून ती छत्रपती शिवरायांना प्रदान करत आहे आणि महाराज गुडघ्यावर टेकून नम्रपणे तिचा स्वीकार करत आहेत, असा हुबेहूब देखावा साकारण्यात आला होता. शेजारीच उभारलेली किल्ल्याची प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

इतिहास आणि श्रद्धा
आई भवानीने महाराजांना दृष्टांत देऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी ही तलवार प्रसाद म्हणून दिली होती, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच तलवारीच्या बळावर महाराजांनी अनेक लढाया जिंकून स्वराज्याचे रक्षण केले. या ऐतिहासिक घटनेचे प्रतीक म्हणून दरवर्षी ही विशेष पूजा मांडली जाते.

दिवसभर भाविकांची मांदियाळी
सकाळी भाविकांची संख्या काहीशी कमी असली तरी, अभिषेक सोहळा संपताच देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. दुपारपर्यंत संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीने गणेश विहार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Web Title : तुलजापुर में शिव जयंती मनाई गई; 'भवानी तलवार' विशेष पूजा

Web Summary : तुलजापुर में तुलजा भवानी मंदिर में विशेष 'भवानी तलवार' पूजा के साथ शिव जयंती मनाई गई। एक मनमोहक प्रदर्शन में शिवाजी को तलवार भेंट करते हुए दर्शाया गया, जिससे हजारों भक्त आकर्षित हुए। मंदिर ऐतिहासिक घटना और शिवाजी महाराज की विरासत का सम्मान करते हुए मंत्रों से गूंज उठा।

Web Title : Shiv Jayanti Celebrated at Tuljapur; 'Bhavani Sword' Special Pooja

Web Summary : Tuljapur celebrated Shiv Jayanti with a special 'Bhavani Sword' Pooja at Tulja Bhavani temple. A captivating display depicted Shivaji receiving the sword, drawing thousands of devotees. The temple resonated with chants, honoring the historic event and Shivaji Maharaj's legacy.