हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ ...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:43+5:302021-08-18T04:38:43+5:30
कोरोना काळात अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकानेवगळता अन्य व्यवसाय बंद राहिले. दुकाने सोडले तर बाकी सर्वच दुकाने बंद राहील. त्यात ...

हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ ...?
कोरोना काळात अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकानेवगळता अन्य व्यवसाय बंद राहिले. दुकाने सोडले तर बाकी सर्वच दुकाने बंद राहील. त्यात सर्वाधिक फटका हॉटेल, बार रेस्टॉरंट, ढाबाचालकांना बसला. ज्यांच्याकडे पाच ते दहा कमगार आहेत, त्यांची मात्र चांगलीच गोची झाली. कामगार कसे सांभाळायचे, हा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यात नियमावलीत वेळोवेळी बदल करत शासनाने हॉटेलमध्ये ५० टक्क्यांची मर्यादा तसेच पार्सल सेवा देण्याची मुभा दिली. काेराेनाचा संसर्ग काहीअंशी कमी झाल्याने कर्मचाऱ्यांचे लसीकरण शंभर टक्के करत रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल, ढाबे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कामगाराची जुळवाजुळव करण्याचा मोठा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. त्यात कामगारांचे लसीकरण हाही त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे तर छोटे हॉटेल व्यावसायिक मात्र कामगार बंद करून स्वत:च हॉटेल चालवत असल्याचे चित्र आहे. त्यात स्वत:चे लसीकरण करून घेतले असल्याचे दिसून येत आहे.
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी
१ हॉटेल
लोहारा शहरातील एका पेट्रोल पंपाजवळील एका हॉटेलचालकाला लसीकरण झाले आहे का, अशी विचारणा केली असता पाच कामगारांपैकी तिघांचे लसीकरण झाले असून दोघांचे लसीकरण बाकी असल्याचे सांगत त्यांचे ही लसीकरण करून घेणार असल्याचे म्हटले.
२ हॉटेल
लोहारा शहरातील एका हॉटेलमधील कामगाराला लसीकरण झाले आहे का, अशी विचारणा केली असता एक डोस झाला आहे. दुसरा डोस घेणे बाकी असल्याचे सांगितले. कामगारांच्या लसीकरणाविषयी बाेलणे टाळले.
रस्त्यांवरील टपऱ्यांवर आनंदीआनंद
रस्त्याच्याकडे असलेल्या चहा व पानटपऱ्यांवर आता सर्व खुले झाल्याने सकाळ-संध्याकाळ गर्दी
रस्त्याच्याकडे भाजीपाला विक्रेत्यांकडे सकाळ संध्याकाळ गर्दी होताना दिसते.
ही परिस्थिती फळ विक्रेत्या गाड्यांवर आहे.
खासगी वाहने ही पूर्ण क्षमतेने वाहतूक करताना दिसत आहे. त्या आठवडी बाजार दिवशी ही वाहनातून नागरिक गर्दी करताना दिसतात.
कोरोनामुळे गेले दीड ते दोन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय बंद आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान तर झालेच. पण आता परत व्यवसाय सुरू करताना कामगाराची जुळवाजुळव व त्यांचे लसीकरण करून घ्यावे लागणार आहे. त्यात प्रशासनाने कामगारांसाठी लसीकरण शिबिर घ्यावे
-एक हॉटेल चालक,लोहारा
लसीकरण झाले का नाही तपासणार कोण ?
शासनाने कमगाराचे लसीकरण शंभर टक्के करत रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल, ढाबे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यात या कामगारांचे लसीकरण झाले की नाही हे तपासण्याची जबाबदारी ही अन्न औषध प्रशासन विभागाची आहे.
- संतोष रुईकर, तहसीलदार,लोहारा
शहरातील हॉटेल, ढाबे - ५०
सध्या सुरू असलेले हॉटेल,ढाबे -४६
हॉटेल,ढाब्यातील कर्मचारी संख्या १३८