स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांना ठिकठिकाणी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST2021-01-14T04:26:52+5:302021-01-14T04:26:52+5:30

जयप्रकाश विद्यालय (फोटो : जयप्रकाश विद्यालय १३) उस्मानाबाद : तालुक्यातील रूईभर येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे ...

Greetings to Swami Vivekananda, Rajmata Jijau | स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांना ठिकठिकाणी अभिवादन

स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांना ठिकठिकाणी अभिवादन

जयप्रकाश विद्यालय

(फोटो : जयप्रकाश विद्यालय १३)

उस्मानाबाद : तालुक्यातील रूईभर येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे यांच्या हस्ते जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, तालुका शिवसेना उपप्रमुख राजनारायण कोळगे, सरपंच दत्तात्रय कस्पटे, उपसरपंच बालाजी कोळगे, प्रा. जयप्रकाश कोळगे, मुख्याध्यापिका शिवकन्या सांळुके, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक के. ए. डोंगरे, प्राचार्य संतोष कपाळे आदी उपस्थित होते.

नवोदय विद्यालय

तुळजापूर : येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्राचार्य के. वाय. इंगळे व उपप्राचार्य एस. व्ही. स्वामी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी तन्वी खोब्रागडे, श्रुती धावारे, पारमी गायकवाड, मानसी मुरकुटे यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतून या महान व्यक्तींच्या जीवनाचा परिचय करून दिला. प्रास्ताविक एस. एस. गायकवाड यांनी केले तर एस. जी. भोरगे यांनी आभार मानले.

लाडू प्रसाद वाटप

तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिरासमोर जिजाऊ महाद्वारात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती शहरवासियांनी साजरी केली. यावेळी जिजामाता प्रतिष्ठानकडून लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पुजारी मंडळाचे किशोर गंगणे, प्रतिष्ठित व्यापारी धर्मराज पवार, इंद्रजित साळुंके, सागर इंगळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष नितीन रोजकरी, छावा संघटनेचे कुमार टोले, इतिहास अभ्यासक विशाल भोसले, मधुकर शेळके, सचिव महेश चोपदार, महेंद्र शिंदे, जगदीश कुलकर्णी, बाळासाहेब भोसले, शिवाजी पवार, विनायक सरवदे, गोरखनाथ पवार, विजय भोसले आदी उपस्थित होते.

जिजामाता विद्यामंदिर

(फोटो : सुशील शुक्ला)

परंडा : येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा करत सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमर साळुंके, ह. भ. प. बालाजी महाराज बोराडे, सत्यजित घाडगे, शरीफ तांबोळी आदी उपस्थित होते. अनन्या ढाकरे, समृद्धी देशमुख, शिफा तांबोळी, स्वराली गवारे, भक्ती नीळ, गायत्री कोरे यांनी जिजाऊंची तर आयान तांबोळी याने स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा केली होती.

आकर्षक रांगोळीने वेधले लक्ष...

(फोटो : रियाज शेख १३)

उस्मानाबाद : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील कलायोगी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आकर्षक रांगोळी रेखाटली. पल्लवी सावंत हिने आरती भोकरे, चैताली वाघमारे, प्रांजली कावरे, दीपराज भोकरे यांना सहकार्याने व राजकुमार कुंभार आणि ऋषिकेश झिरमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा बाय आठ या आकारातील ही रांगोळी बारा तासात पूर्ण केली.

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

(फोटो : अरविंद कातुरे १३)

जवळा (नि) : येथील जिल्हा परिषद प्रशालेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ऑनलाईन दशरात्रोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून निबंध, वक्तृत्व, एकांकिका, भाषण व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच डॉ. सुप्रिया गुटाळ यांनी महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक नवनाथ कदम, कल्याणी तांबे व ज्ञानेश्वर कातुरे, मैना बारकुल, नंदा चौगुले, सुषमा पेठकर, दिगंबर मोहिते, भागवत देशमुख, दत्तात्रय काळे, येळगे, महादेव राऊत आदींनी पुढाकार घेतला.

गांधी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

(फोटो : समीर सुतके १३)

उमरगा : येथील महात्मा गांधी विद्यालयात ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहुल सोनवणे होते. बी. व्ही. सुरवसे यांनी प्रास्ताविक केले तर जी. व्ही. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता प्रज्ञा पवार हिच्या राजमाता जिजाऊंच्या ओवीने झाली. कार्यक्रमाला शिक्षक डी. एस. सरवदे, आर. एम. महिंद्रकर, बी. एस. तेलंग, डी. पी. पवार, एस. एस. कांबळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी बी. एम. सूर्यवंशी व नववी, दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

श्री रामानंद महाराज विद्यामंदिर

(फोटो : रामानंद स्कूल १३)

काजळा : येथील रामानंद विद्यालयात आयोजित कार्यक्रमात आर. डी. पवार तर विद्यार्थ्यांमधून दिव्या क्षीरसागर हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी एन. एम. वाकडे, डी. जे. खारगे, व्ही. ए. पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख पी. जे. पवार, एस. डी. राठोड, प्रा. मडके, प्रा. करंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Swami Vivekananda, Rajmata Jijau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.