शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक रुग्णालयात बसवणार शासकीय कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : कोरोनावर उपचार करणा-या खाजगी रुग्णालयांसाठी शासनाने दर निश्चित करून दिले आहेत. तरीही, वाढीव बिले आकारली जाऊ नयेत, ...

उस्मानाबाद : कोरोनावर उपचार करणा-या खाजगी रुग्णालयांसाठी शासनाने दर निश्चित करून दिले आहेत. तरीही, वाढीव बिले आकारली जाऊ नयेत, यासाठी अशा प्रत्येक रुग्णालयात ऑडिटिंगसाठी शासकीय कर्मचारी दिवसभर बसविण्यात येणार आहे. ऑडिटर्सची संख्या कमी असल्याने गरजेनुसार सध्या शाळा सुरू नसल्याने शिक्षण विभागाची मदत घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उस्मानाबाद येथे दिली.

कोरोना स्थिती व खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी नंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तिस-या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने राज्यात सर्वत्र आरोग्य यंत्रणेची काय तयारी आहे, याचा दौ-यातून आढावा घेत आहोत. यात असे दिसून येत आहे की, रुग्णसंख्या कमी होऊ लागताच टेस्टिंग कमी केल्या जात आहेत. असे होता कामा नये. आरोग्य यंत्रणेला टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पीक कर्जाच्या बाबतीत नोंदविलेले निरीक्षणही त्यांनी यावेळी नमूद केले. जिल्हा बँका वगळता इतर सर्व बँका मोठ्या, बागायतदार शेतक-यांनाच भरमसाट कर्ज देत आहेत. याद्वारे भरपूर पीक कर्जवाटप केल्याचे ते दाखवतात. मात्र, आता यापुढे कर्ज दिलेल्या शेतक-यांची संख्या वाढली पाहिजे, अशी सूचना बँकांना करीत आहोत, जेणेकरून छोट्या शेतक-यांनाही या कर्जाचा लाभ होईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार ओम राजे निंबाळकर हेही उपस्थित होते.

आमदार निधीत १ कोटींची वाढ...

सध्या आमदारांना ४ कोटींचा निधी दिला जात आहे. यातील १ कोटी हे कोविड कामांसाठी देण्यात आले आहेत. मात्र, आमदारांची मागणी वाढल्याने कोविड कामांसाठी त्यांच्या निधीत आणखी १ कोटी रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय लवकरच बैठकीत घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.