चिवरी येथील रहिवासी, माजी सैनिक विठ्ठल होगाडे यांनी फेब्रुवारी २०२०मध्ये हे प्रशिक्षण सुरू केले. मात्र, याचे औपचारिक उद्घाटन दोन दिवसांपूर्वी अर्जुन पुरस्कारप्राप्त तथा तालुका क्रीडाधिकारी सारीका काळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे, बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक रामचंद्र आलुरे, सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, मारुती खोबरे, मोतिराम चिमणे, सुभाष सूर्यवंशी, जयपालसिंह बायस, मुख्याध्यापिका लक्ष्मी बिराजदार, शंकरराव कोरे, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, तलाठी गायकवाड, पोलीसपाटील योगेंद्र बिराजदार, बालाजी शिंदे, श्रीकांत अणदूरकर आदी उपस्थित होते. यावेळी सारीका काळे, पोपटराव पाटील, डॉ. सिद्रामप्पा खजुरे, रामचंद्र आलुरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशिक्षणार्थिंनी सुंदर प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली. या उद्घाटन कार्यक्रमानंतर केंद्राच्या नामफलकाचे अनावरण तसेच केंद्राच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. अकॅडमी केंद्राचे संस्थापक विठ्ठल होगाडे यांनी प्रास्ताविक केले. शिवराज भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले.