मांजरा नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:31 IST2025-08-15T09:30:55+5:302025-08-15T09:31:28+5:30

मुसळधार पावसामुळे पूरस्थिती

flooding in manjara river alert issued for villages along the river | मांजरा नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मांजरा नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पारगाव (जि. धाराशिव): वाशी तालुक्यातील पारगाव आणि परिसरात १४ ऑगस्टपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला महापूर आला आहे. १५ ऑगस्ट रोजी पहाटेपासून नदीची पाणीपातळी प्रचंड वाढली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाचा जोर आणि पूरस्थिती....

१४ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही कायम होता, ज्यामुळे मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. या महापुरामुळे परिसरातील स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. तसेच, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पुराच्या पाण्याने वेढा घातल्यामुळे पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाली आहे.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा...

पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसील प्रशासनाने नदीच्या काठावर असलेल्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि नदीपात्राजवळ जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे स्थानिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण आहे, परंतु प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Web Title: flooding in manjara river alert issued for villages along the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.