उमरगाजवळ दाट धुक्यात कारचा भीषण अपघात; बिदरच्या एकाच कुटुंबातील ४ ठार, २ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:59 IST2025-10-21T13:57:25+5:302025-10-21T13:59:56+5:30
दाट धुक्यात महामार्गांवरील वाहनाचा अंदाज न घेता अचानक दुसऱ्या कारने रस्त्यात प्रवेश केल्याने हा अपघात झाल्याचे कळते.

उमरगाजवळ दाट धुक्यात कारचा भीषण अपघात; बिदरच्या एकाच कुटुंबातील ४ ठार, २ जखमी
उमरगा ( धाराशिव): विजापूर येथे देवदर्शन करून आपल्या गावी परत जाणाऱ्या कारला अचानक दुसऱ्या कारने अचानक धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील काशीमपूर (प) येथील एकाच परिवारातील चार जण ठार तर दोन जणं गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील दाळिंब गावाजवळ मंगळवार दि. 21 रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घडली. दाट धुक्यात महामार्गांवरील वाहनाचा अंदाज न घेता अचानक दुसऱ्या कारने रस्त्यात प्रवेश केल्याने हा अपघात झाल्याचे कळते.
याबाबतची माहिती अशी की,मंगळवारी पहाटे दाट धुके होते.यावेळी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा जिल्ह्यातील काशीमपूर गावातील एकाच परिवारातील सखे चुलत भाऊ परिवारासह सोमवारी दि. 20 रोजी अमावस्या निमित्त विजापूर जिल्ह्यातील हुलजगीं येथील महालिंगरायाच्या यात्रेला गेले होते.रात्री दीड वाजता देव दर्शन करून कार क्रमांक (के.ए ३८ एम ९९४६) या गाडीने सर्वजण परत गावाकडे येत असताना उमरगा तालुक्यातील दाळिंब गावाच्या पुढे साईप्रसाद पेट्रोल पंपानजीक महामार्गांवर दुसऱ्या बाजूने सोलापूर दिशेने जाणारी कार क्र. (एम एच १४ ई पी ०७३२) ही गाडीच्या चालकाला दाट धुक्यामुळे रस्त्यावर असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला धावणाऱ्या कारवर जाऊन आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात रतीकांत मारूती बसगोंडा, वय ३० वर्षे ( चालक) रा.काशीमपूर (पी)ता.जिल्हा बिदर,शिवकुमार चितांनंद वग्गे वय २६ वर्षे, सदानंद मारुती बसगोंडा वय १९ वर्षे, संतोष बजरंग बसगोंडा वय १९ वर्षे सर्व राहणार काशीमपूर ता.जिल्हा बिदर कर्नाटक हे चार जण ठार झाले आहेत तर या कारमधील दिगंबर जगन्नाथ संगोळगी वय ३१ वर्षे रा.काशीमपूर हे जखमी झाले आहेत तर दुसऱ्या कारचा चालक लावण्य हणमंत मसोनी वय २२ वर्षे रा.सोलापूर हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच दाळिंब व शिवाजी नगर तांड्यातील दाळिंबचें सरपंच प्रशांत देवकते,बाबा जाफरी, शिवाजी जाधव, असिफ शिकार, अजीम लाडू,भास्कर राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु तर लागलीच मुरूम पोलीस ठाण्याचे सं. पो नी संदीप दहिफळे व पोलीस कर्मचारी घटना स्थळी धाव घेत मयत व जखमीना बाहेर काढले अपघात एवढा भयंकर होता की गाडित सर्वजण अडकल्याने जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले. यावेळी सर्वांना तात्काळ उमरगा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर जखमी पैकी एकाला बिदर तर दुसऱ्यावर उमरगा येथे उपचार सुरु आहेत.