भूम तालुक्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:08 IST2018-09-18T16:01:28+5:302018-09-18T16:08:10+5:30
भूम तालुक्यातील पंढरेवाडी येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

भूम तालुक्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
उस्मानाबाद : भूम तालुक्यातील पंढरेवाडी येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विक्रम शेषेराव हुंबे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शेषेराव हुंबे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.
दीड वर्षापूर्वी वडिलांनीही केली होती आत्महत्या
मयत विक्रम हुंबे यांचे वडिल शेषेराव भुजंगराव हुंबे यांनीही दीड वर्षांपूर्वी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांना विक्रम हा एकुलता एक मुलगा होता. विक्रमवर कर्ज असल्याने उन्हाळ्यात एक एकर शेती विकून सदरील कर्जाची परतफेड केली होती.