शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रंगपंचमी दिनी कुटुंबावर दु:खाच्या छटा; रंगाचा हात धुण्यास गेलेल्या चिमूकल्याचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:53 IST

खाेताचीवाडी येथे रंगपंचमी दिनीच घडली दुर्दैवी घटना; ही वार्ता समजताच संपूर्ण गावावर शाेककळा पसरली.

- बाबूराव चव्हाणतुळजापूर (जि. धाराशिव) : रंगपंचमी दिनी रंगांची उधळण करून हात-पाय धुण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या शेततळ्यावर गेला. याचवेळी आठ वर्षीय सार्थकचा पाय घसरला अन् पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील खाेताचीवाडी येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ही वार्ता समजताच संपूर्ण गावावर शाेककळा पसरली.

खाेताचीवाडी येथील शनी मंदिराच्या पाठीमागे सतीश शिंदे वास्तव्यास आहेत. रंगपंचमी दिनी म्हणजेच बुधवारी ते बाहेर गेले हाेते. पत्नीवर शस्त्रक्रिया झाल्याने त्या घरातच हाेत्या. तर आजी शेतामध्ये गेली हाेती. याचवेळी त्यांचा दुसरीच्या वर्गात शिकणारा आठ वर्षीय मुलगा सार्थक रंग खेळण्यासाठी घराबाहेर पडला. बराच कालावधी लाेटूनही ताे घरी काही परतला नाही. त्याची शाेधाशाेधही केली. परंतु, ताे काही सापडला नाही. यानंतर शिंदे कुटुंबीयांनी घराच्या पाठीमागे खाेदलेल्या शेततळ्याकडे जाऊन पाहिले असता, पाण्यात सार्थकचा मृतदेह आढळून आला. रंग खेळून झाल्यानंतर हात-पाय धुण्यासाठी ताे शेततळ्यावर गेला हाेता. त्याचा पाय घसरला अन् पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, असे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पाण्यातील मृतदेह बाहेर काढून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर शव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सार्थकच्या पश्चात आई, वडील, दाेन बहिणी, भाऊ, आजी, आजाेबा असा परिवार आहे.

मृतदेह पाहून हंबरडा फाेडला...रंगपंचमीनिमित्त सार्थक सकाळी रंग खेळण्यासाठी गेला हाेता. अन् सायंकाळच्या सुमारास त्याचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फाेडला.

आठ-दहा दिवसांपूर्वीच खाेदले तळेशेतकरी सतीश शिंदे यांनी आपल्या घराच्या पाठीमागेच शेततळे खाेदले आहे. साधारणपणे आठ ते दहा दिवसांपूर्वीच या तळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी साेडले हाेते. याच तळ्यात बुडून सार्थकचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संपूर्ण गाव हळहळले...आठ वर्षीय सार्थकचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची वार्ता समजताच गावावर शाेककळा पसरली. उत्तरीय तपासणीनंतर शव गावात आणल्यानंतर अख्खं गाव हळहळलं.

टॅग्स :dharashivधाराशिवDeathमृत्यू