द्राक्ष उत्पादक संघाची सावरगावात स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:10+5:302021-08-20T04:37:10+5:30

सावरगाव, माळुंब्रा, तामलवाडी हा भाग पूर्वी शुगरकेन नावाने ओळखला जायचा. मात्र, उसाच्या शेतीला बगल देत ऊस उत्पादक शेतकरी द्राक्ष ...

Establishment of Grape Growers Association at Savargaon | द्राक्ष उत्पादक संघाची सावरगावात स्थापना

द्राक्ष उत्पादक संघाची सावरगावात स्थापना

सावरगाव, माळुंब्रा, तामलवाडी हा भाग पूर्वी शुगरकेन नावाने ओळखला जायचा. मात्र, उसाच्या शेतीला बगल देत ऊस उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादनाकडे वळला. या भागात १ हजार हेक्टरवर द्राक्षाची लागवड आहे. या भागातील पाच हजार टन द्राक्षे दरवर्षी परदेशात निर्यात होतात. या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक महादेव वडणे यांच्या पुढाकारातून तुळजाभवानी द्राक्ष उत्पादक संघाची स्थापना करण्यात आली. सावरगाव येथे शीतगृह उभारून फळे, भाज्या निर्यातीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे संचालकांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, नरसिंग धावणे, द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक महादेव वडणे, लक्ष्मण शेंडगे, बाबासाहेब पाटील, भाऊ पाटील, मनोज धावणे आदी उपस्थित होते.

Web Title: Establishment of Grape Growers Association at Savargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.