शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

शिंदेंच्या मंत्रिमंडळात दुष्काळी उस्मानाबादला दोन पदांची आस; एक नाव तर फिक्सच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 3:57 PM

दुष्काळी जिल्ह्यात मंत्रिपदांची लॉटरी लागण्याची चिन्हे

- चेतन धनुरेउस्मानाबाद : नैसर्गिक अन् राजकीयदृष्ट्याही दुष्काळी गणल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याची नव्या सरकारात लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे यातील एकाचे तर मंत्रिपद जवळपास फिक्स आहेच. आता दुसरे मंत्रिपद हे दुसऱ्या आमदाराच्या पदरी पडणार की भाजप आमदाराची लॉटरी लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा अपवाद वगळता आजवर जिल्ह्याला एकही महत्त्वाचे खाते असलेले मंत्रिपद मिळाले नाही. मागच्या टर्मला चारपैकी तीन आमदार हे विरोधी पक्षातील होते. एकमेव आमदार ज्ञानराज चौगुले हे सत्ता पक्षातील राहिले. मात्र, त्यांनाही संधी मिळाली नाही. यावेळच्या निवडणुकीत तीन आमदार शिवसेनेचे, तर एक भाजपचा निवडून आला. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत जिल्ह्याला एक तरी मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती, ती फोल ठरली. यामुळे दुखावले गेलेले सेनेचे आमदार तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांची साथ दिली.

यातही तानाजी सावंत हे आघाडीवर होते. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे आमदार चौगुले हेही एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत आहेत. सलग तीन वेळा निवडून आलेले चौगुले हे उद्धव ठाकरे यांचा शब्द ओलांडून शिंदे यांच्या प्रेमापोटी बंडात सहभागी होतात यातच सर्वकाही आले. त्यामुळे त्यांचेही पारडे जड आहे. मात्र, ऐनवेळी दोघांपैकी एकाला संधी देण्याचे ठरल्यास चौगुले यांच्याकडे महामंडळ वा तत्सम जबाबदारी या टर्ममध्ये सोपविली जाण्याची शक्यता अधिक आहे.

भाजपच्या आशेला पालवी...मागच्या टर्मपर्यंत जिल्ह्यात भाजपचा एकही विधानसभा आमदार नव्हता. ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांना पक्षात आणून त्यांना तुळजापूरहून निवडणूक लढविण्यास प्रेरित केले. येथील काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकरराव चव्हाण यांना पराभूत करीत पाटील यांनी विजय मिळविला. भाजपला जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे येथे मंत्रिपद देणे अत्यावश्यक ठरते. यातूनच राणाजगजितसिंह पाटील यांचे पारडे जड ठरते आहे. परिणामी, जिल्ह्यात किमान दोन मंत्रिपदे येण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस