दोन ठिकाणी छापे
नळदुर्ग : अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथील पोलिस ठाण्याच्या पथकाने १० जानेवारी रोजी होर्टी येथे दोन ठिकाणी छापे टाकले. पहिल्या घटनेत शिवाजी सगट हे गावातील त्यांच्या चिकन दुकानासमोर देशी दारूच्या पाच बाटल्यांसह तर दुसऱ्या घटनेत शाहुराज राजमाने हे गावातील त्यांच्या हाॅटेलसमोर विदेशी दारूच्या बाटल्यांसह मिळून आले. त्यांच्या विरुध्द स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोबाईलची चोरी
उस्मानाबाद : तडवळा येथील बांधकामावरील मजूर गंगाधर मारूती राठोड (रा. हरंगुळ खु) हे ९ व १० जानेवारीच्या रात्री सहकाऱ्यांसह बांधकामावर झोपले होते. यावेळी त्यांचे दोन मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. याप्रकरणी गंगाधर राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.